तरुण दिसण्यासाठी तब्बूनं खरेदी केलं ५० हजाराचं क्रीम, पुढे जे घडलं ते तिच्याकडनंच ऐका Tabbu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tabbu Bought a face cream of rupees 50,000 but will never make that mistake again, why?

तरुण दिसण्यासाठी तब्बूनं खरेदी केलं ५० हजाराचं क्रीम, पुढे जे घडलं ते तिच्याकडनंच ऐका

Tabbu: तब्बू नेहमीच तिच्या सिनेमांमुळे चर्चेत राहिली. आज वयाची पन्नाशी गाठलेली तब्बू आपल्या प्रत्येक सिनेमागणिक अधिक प्रतिभावंत अभिनेत्री बनत चालली आहे. गेल्या तीन दशकांपासून तब्बू आपल्या टॅलेंटसोबतच आपल्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते. तिच्या सौंदर्यात एक वेगळीच मादकता आहे. एका मुलाखतीत तब्बूनं वय वाढतंय पण आपण अधिक का तरुण दिसत चाललो आहोत याचं रहस्य सांगितलं आहे.(Tabbu Bought a face cream of rupees 50,000 but will never make that mistake again, why?)

हेही वाचा: सोनमच्या मुलासंदर्भात मोठी भविष्यवाणी, ज्योतिषी संजय जुमानी म्हणाले,'हा मुलगा पुढे..'

तब्बू म्हणाली की,''माझं असं काही खास रूटीन नाहीय, ज्याला मी अगदी काटेकोरपणे पाळते. मी ज्या क्षेत्रात काम करते त्याच्या गरजा मला माहीत आहेत आणि म्हणूनच मी सौंदर्य आणि फिटनेस कसं चांगलं राहिल यासाठी पूर्ण प्रयत्न करते''.

वाढत्या वयातही इतकं तरुण ती कशी दिसते यावर जेव्हा तिला विचारलं गेलं तेव्हा ती हसत-हसत म्हणाली,''काही सीक्रेट वगैरे नाही यात. पण एक किस्सा इथे आवर्जुन सांगेन म्हणजे तुम्हाला थोडी कल्पना येईल. एकदा माझी मेकअप आर्टिस्ट मला म्हणाली,'मॅम तुमची स्कीन खूप चांगली वाटतेय,काही खास करता का स्कीनसाठी?'.

''कधीतरी जर मी तिला सांगेन की मी चेहऱ्याला कॉफी लावते आणि त्यासाठी कॉफीचं झाडही घरी लावलंय मी, तर ती मला पटकन बोलेल,तुम्ही तसं नका करु मॅम. यापेक्षा तुम्हाला हे क्रीम वापरायला हवं. मग ती कोणतंतरी ५० हजाराचं वगैरे क्रीम मला सांगेल. एकदा तिच्या सांगण्यावरनं विकत घेतलेलं तेवढं पूरे झालं. आता यापुढे कानाला खडा लावलाय,कधीच असं महागडं खरेदी करुन पैसे वाया घालवणार नाही''.

हेही वाचा: KBC 14: अख्खा एपिसोड रडत-रडतच खेळली 'ही' स्पर्धक, अखेर अमिताभसमोर दिली भावूक कबूली

तेव्हा लगेच मुलाखतीत जेव्हा तिला विचारलं की तुझ्या सौंदर्याचं रहस्य तुझं आनंदी राहणं आहे का? तेव्हा तब्बू लगेच उत्तरली,''यात मोठा वाटा माझ्या कुटुंबाचा आहे...डीनए शेवटी महत्त्वाचा. मी असं काही खास करत नाही माझ्या चेहऱ्यासाठी. फक्त मला माहीत आहे की मला चांगलं दिसायचं आहे. तेव्हा प्रयत्न करते ते बिघडू नये. पण हे तर सगळेच करतात. त्यासाठी मग अभिनेत्रीच असायला हवं असं नाही. सगळ्यांनाच सुंदर दिसावसं वाटतं,हेल्दी रहावं असं वाटतं. तसंच सगळ्यांनाच आपलं मानसिक स्वास्थ्य नीट रहावं असं देखील वाटतं. मी सुद्धा तसाच प्रयत्न करते''.

हेही वाचा: Video: 'नवा गडी,नवं राज्य'च्या सेटवर कोण आहे सायशाची फनी ताई? आनंदी की रमा?

तब्बूला आपण शेवटचं 'भूलभूलैय्या २' मध्ये पाहिलं होतं. या सिनेमात तिचा डबल रोल होता. आता लवकरच ती विशाल भारद्वाजच्या सिनेमात दिसणार आहे. विशाल भारद्वाज 'खुफिया' नावाचा सिनेमा बनवतोय. जो नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय. यामध्ये तब्बूसोबत अली फजल काम करत आहे.

Web Title: Tabbu Bought A Face Cream Of Rupees 50000 But Will Never Make That Mistake Again

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..