सोनमच्या मुलासंदर्भात मोठी भविष्यवाणी, ज्योतिषी संजय जुमानी म्हणाले,'हा मुलगा पुढे..'Sonam Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Numerologist Sanjay B Jumaani prediction about sonam kapoor Son Vayu

सोनमच्या मुलासंदर्भात मोठी भविष्यवाणी, ज्योतिषी संजय जुमानी म्हणाले,'हा मुलगा पुढे..'

Sonam Kapoor: सोनम कपूरच्या नुकत्याच महिन्याच्या झालेल्या वायु कपूर-आहूजा या मुलासंदर्भात बॉलीवूडचे प्रसिद्ध ज्योतिषी संजय जुमानी यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच सोनमनं जेव्हा सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून आपल्या बाळाचे नाव जाहीर केले तेव्हा एक छोटेखानी नामकरण सोहळाही कपूराच्या घरात पार पडला आणि यासाठी बॉलीवूडच्या या प्रसिद्ध ज्योतिषी असलेल्या संजय जुमानी यांना पाचारण करण्यात आले होते. तेव्हाच त्यांनी सोनमच्या मुलाविषयी ही भविष्यवाणी केल्याचं समोर आलं आहे. (Numerologist Sanjay B Jumaani prediction about sonam kapoor Son Vayu)

हेही वाचा: 'हीच खरी क्वीन...' म्हणत चक्क कंगनानं पोस्ट केला 'त्या' बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटो

माहितीनुसार कळत आहे की,सोनम आणि आनंदनं आपल्या मुलासाठी तीन नावं शोधून ठेवली होती. त्याच्या नावात त्यांना दोन्ही आडनावं जोडायची असल्यानं कोणत्या नावापुढं ही दोन आडनावं सूट होतील याचा विचार ते दोघे करत होते. पण जेव्हा संजय जुमानी यांनी वायु या नावावर शिक्कामोर्तब केलं तेव्हा मात्र कपलनेही तेच नाव आपल्या मुलाला द्यायचे ठरवले.

जुमानी यांनी ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, ''मुलाचे नाव काय असावे याबाबतीत सोनमनं माझ्या निर्णयावर विश्वास ठेवत शिक्कामोर्तब केलं. कारण आमचा खूप आधीपासून परिचय आहे. सोनमची आई सुनिता कपूर या आमच्या फॅमिली फ्रेंड आहेत. याआधी एकता कपूरच्या मुलाच्या नामकरण सोहळ्याला मी गेलो होतो. ती माझी खूप जुनी क्लाएंट आहे. तिच्या मुलाचे नाव काही दिवसांपूर्वी रवी कपूर असे बदलून ठेवण्यात आले आहे''.

हेही वाचा: Viral Video: मद्यधुंद अवस्थेत साराचा सुरक्षा रक्षकाला चुकीचा स्पर्श, नेटकरी भडकलेयत..

जुमानी म्हणाले, ''प्रत्येक आई-वडीलांना नामकरण विधीपासूनच वाटत असतं की आपल्या मुलाचं पुढे सगळं चांगलं व्हावं. त्यामुळे तेव्हाच काही पूजा-विधी केल्या जातात. म्हणजे एक सकारात्मक सुरुवात होते त्या बाळाच्या आयुष्याची. अगदी त्याच्या शिक्षणापासून ते पुढच्या करिअर पर्यंत सगळ्याचा विचार तेव्हा केला जातो.''

याचवेळी जुमानी यांनी सोनम कपूरचा मुलगा वायू कपूर-आहुजाच्या भविष्याविषयी देखील काही गोष्टी स्पष्ट केल्या. ते म्हणाले, ''वायू मोठा होऊन बॉलीवूडमध्ये एन्ट्री करेल. तो खूप रोमॅंटिक आणि क्रिएटिव्ह मुलगा बनणार''.

Web Title: Numerologist Sanjay B Jumaani Prediction About Sonam Kapoor Son

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..