'अजयमुळे माझं लग्न होऊ शकलं नाही'

ajay devgan and tabu
ajay devgan and tabu

मुंबई - आपल्या अभिनयामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री म्हणून तब्बुचे नाव घ्यावे लागेल.  तिच्या आणि अभिनेता अजय देवगण यांच्या जुन्या अफेयरची चर्चा नेहमीच होत असते. मात्र आता तब्बुने जो खुलासा केला आहे त्यावरुन सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगलेली दिसत आहे. 49 वर्षांची तब्बू अजुन अविवाहितच आहे. त्याचे कारण सांगताना तिने अजय देवगणकडे निर्देश केला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने धक्कादायक खुलासा केला आहे. आजवर अनेकदा तब्बुने लग्न का केलं नाही यावरुन तिला प्रश्न विचारण्यात आले होते. तिच्या चाहत्यांमध्येही तब्बुच्या लग्नाविषयक गुढ कायम आहे. तिला आजवर तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला नाही का, तिने लग्न न करण्यामागे काय कारण आहे, असे प्रश्नही तिला विचारले जातात. नुकतेच तिने केलेल्या व्टिटमध्ये असे म्हटले आहे की, मी अविवाहित राहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे अजय देवगण हे आहे. तिच्या अशाप्रकारच्या वक्तव्यामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The Suitable team brings you #ASuitableBoy Streaming now on @netflix_in

A post shared by Tabu (@tabutiful) on

तब्बुने एका मुलाखतीच्या दरम्यान असे सांगितले की, मी अजयला गेल्या 25 वर्षांपासून ओळखते. अजय हा त्यावेळी माझा भाऊ समीर आर्यचा शेजारी आणि जवळचा मित्र होते. मी कुणाशी बोलायला लागले तर त्या मुलाला हे दोघेजण बदडून काढायचे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@abheetgidwani @bbhiral @mehakoberoi @aasthasharma Finally.

A post shared by Tabu (@tabutiful) on

तब्बुने नुकतेच 50 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. एक यशस्वी कलाकार असणारी तब्बु ही अद्याप अविवाहीतच आहे. लहान असतानाच तिने चित्रपटांतून काम करण्यास सुरुवात केली होती. 'हम नौजवान' आणि  'बाजार' यांच्यासह अनेक चित्रपटांतून त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली आहे. 
 

 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com