Tabu : 'भोला'च्या सेटवर तब्बुला अपघात, स्टंट करताना दुखापत

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बुच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. ती म्हणजे भोला या चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान तिला (Bhola Movie Set) अपघात झाला आहे.
Tabu Accident
Tabu Accident esakal

Bollywood Actress Tabu; बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बुच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. ती म्हणजे भोला या चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान तिला (Bhola Movie Set) अपघात झाला आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. अजय देवगणच्या या चित्रपटामध्ये तब्बु ही एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत आहे. शुटींगच्या वेळी स्टंट (Ajay Devgn) करताना तिला अपघात झाला त्यात तिला दुखापत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बुच्या डोक्याला आणि डोळ्याला दुखापत झाली आहे.

आपल्या हटक्या आणि प्रभावी अभिनयामुळे तब्बुनं बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान (Bollywood Movies) निर्माण केले आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. आजवर तिनं वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करुन लोकप्रियता मिळवली आहे. यापूर्वी देखील अजय देवगणच्या अनेक चित्रपटांमध्ये तब्बुनं महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता ती त्याच्या भोला नावाच्या चित्रपटामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुटींगच्या दरम्यान एका घनदाट जंगलातून तब्बु ट्रक चालवत होती. काही चोर तिचा पाठलाग करत होते. त्या दरम्यान एका चोराच्या दुचाकीचा धक्का ट्रकला लागला. यावेळी तब्बुला गाडी आवरणं कठीण झालं. त्यात ट्रकची काच फुटून तिला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Tabu Accident
Darling Review: 'दैवं देतं कर्म नेतं' सांगणारा 'डार्लिंग', आलियाची कमाल!

त्या काचेच्या तुकड्यानं तब्बुच्या डोळ्याला दुखापत केली आहे. सुदैवानं मोठा अपघात झाला नसून तब्बुला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, काळजी करण्याचे कारण नसून आता ती सुखरुप असल्याचे सांगितले गेले आहे. अजयनं आता तब्बुला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तिला काही दिवसांची सुट्टी देखील दिली आहे. भोला चित्रपटापूर्वी तब्बु ही अजयच्या दृश्यम या चित्रपटामध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती.

Tabu Accident
Alia Bhatt: 'पुरुष पण आता बाळंत होणारेत!' आलिया पुन्हा बोलली

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com