esakal | आयुष्मान खुरानाची पत्नी ICU मध्ये; कारण की..
sakal

बोलून बातमी शोधा

Tahira kashyap Ayushmann Khurrana

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपला दूधीच्या ज्यूसमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

आयुष्मान खुरानाची पत्नी ICU मध्ये; कारण...

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

दूधी हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. दूधीच्या रसाने रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यासोबतच दूधीचा रस जाडेपणा, आम्ल पित्त किंवा ह्रदयरोग यासारख्या आजारांवर फायदेशीर ठरतो. मात्र दूधीचा रस हा जितका गुणकारी आहे, तितकाच तो नुकसानदायकही ठरु शकतो. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपला दूधीच्या ज्यूसमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. त्यामुळे यापुढे दूधीचा ज्यूस पिण्यावेळी काळजी घ्या, असा मेसेज ताहिराने चाहत्यांना दिला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने याबद्दलचा तिचा अनुभव सांगितला आहे.

दूधीच्या रसामुळे निर्माण होणाऱ्या विषबाधेच्या गंभीर परिणामांबद्दल ताहिराने सांगितले आहे. "मी नेहमी हळदीचा ज्यूस, दूधी आणि आवळ्याच्या रसाचे सेवन करते. मात्र त्या दिवशी मी जो रस प्यायलीय तो थोडा कडवट होता. तो रस प्यायल्यानंतर मला फार उलट्या झाल्या. माझे अचानक ब्लडप्रेशर वाढले. यानंतर मला लगेच आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. या सर्व प्रकारानंतर आता मी ठीक आहे, पण तरीही हा अनुभव फार वाईट होता.” त्यामुळे ताहिराने तिच्या, चाहत्यांना आणि तिच्या मित्रांना दुधीचा रस योग्य पद्धतीने कसा प्यावा, हे सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला. यासोबत ताहिरा कश्यपने एक पोस्टदेखील शेअर केली आहे. “कडू दूधीच्या रसाचे फार गंभीर परिणाम होतात. कधीकधी यामुळे विषबाधाही होऊ शकते. हे अत्यंत धोकादायक आहे. फक्त आरोग्य चांगलं राहाव म्हणून रस पिऊ नका! तर ते योग्य पद्धतीने प्यायला पाहिजे.” असे तिने या म्हटले आहे.

हेही वाचा: लाॅकडाऊनमध्ये आयुष्मान खुराना कोणत्या विषयाचे धडे घेतोय पाहा...

ताहिरा कश्यप एक प्रोफेसर आहे, तसेच तिने 'टॉफी बिफोर' नावाच्या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. २०१८ मध्ये ताहिराला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. ताहिरा आणि आयुष्मान ११ वर्ष एकमेकांना डेट करत होते. शेवटी २०११ साली ते दोघे लग्नबंधनात अडकले.

loading image
go to top