तैमुरही फॉलो करणार का इंग्लंडला जाण्याची परंपरा ?

वृत्तसंस्था
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

तैमुर इंग्लंडला जाणार का नाही यावर सध्या चर्चा सुरु आहे. जाणून घ्या नक्की हे काय प्रकरण आहे !

मुंबई : बॉलिवूडमध्ये जितकी चर्चा कलाकारांची आहे तेवढीच किंबहूना अधिक चर्चा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टार किड्सची आहे. त्यातच जर सर्वाधिक पसंती असलेला आणि वयाच्या तीसऱ्या वर्षीच फेमस असलेला स्टार किड म्हणजे तैमुर अली खान. करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुर इंटरनेट सेंसशन आहे. तैमुरची एक झलक टिपण्यासाठी पॅपराझीही धडपड करत असतात. तैमुरच्या फोटोंपासून ते अगदी त्याच्या कपड्यांपर्यंत सर्व काही सोशल मीडियावर ट्रेंड होत असतं. तैमुर इंग्लंडला जाणार का नाही यावर सध्या चर्चा सुरु आहे. जाणून घ्या नक्की हे काय प्रकरण आहे !

नेहा-आदित्यच्या लग्नाची तयारी सुरु अन्, एक्स बॉयफ्रेंडची पोस्ट व्हायरल !

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#family #today #familytime

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

ज्याच्या एका फोटोने इंटरनेट क्रेझी होतं तो म्हणजे स्टार किड तैमुर. तैमुरचे वडिल म्हणजे सैफ अली खान हा बॉलिवूडचा टॉपचा अभिनेता आहे. सैफचे वडिल म्हणजे मंसून अली खान हे भारतीय क्रिकेट संघाचे क्रिकेटर होते. तैमुरचे आजोबा मंसूर अली खान आणि सैफ दोघेही शिक्षणासाठी परदेशात होते. इंग्लंडच्या बोर्डिंग स्कूलमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. आता छोटा नवाब तैमुरही शिक्षणासाठी बोर्डिंगला इंग्लंडला जाणार का? असा सवाल केला जात आहे. इंग्लंडच्या Hertfordshire च्या 'Lockers Park School' शाळेमध्ये तैमुर जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. हि शाळा जगातील सर्वोत्तम शाळांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी करीनाने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, तैमुरला ती लवकरच बोर्डिंग स्कूलला पाठविणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Artist timmi

A post shared by Taimur Ali Khan Pataudi  (@taimuralikhanx) on

काय आहे परंपरा ?
सैफ अली खान जेव्हा 9 वर्षांचा होता तेव्हाच त्याला Lockers Park School शाळेमध्ये पाठविण्यात आले होते. मंसूर अली खान यांच्यासारखचं सैफही या शाळेत गेला. पतौडी घराण्याच्या या परंपरेला तैमुर पुढे चालविणार का हे आता पाहावं लागेल. सैफचा नुकताच 'तान्हाजी' आणि 'जवानी जाने मन' हे सिनेमे रिलिज झाले.

रणबीर-आलियाचं शुभमंगल! 'या' महिन्यात होणार लग्नं...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sunday mood 

A post shared by Taimur Ali Khan Pataudi (@taimuralikhanx) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taimur Ali Khan to follow Pataudi tradition and attend boarding school in England