तैमुर माझा गोजिरवाणा 

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

तैमुरला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच करिनाने पुन्हा कामाला सुरुवात केलीय. तिच्या कम बॅकने बॉलिवूडमध्ये जणू पुन्हा चैतन्य पसरलंय. हो, अभिनेत्री करिना कपूर ही बॉलिवूडचं चैतन्य आहे. ती तिच्या असण्याने अशी काही जादू करते की बस्स; पण हल्ली ती जिथे जाते तिथे तिला तिच्या लाडक्‍या तैमुरबद्दलच प्रश्‍न विचारले जातायत. मग त्या प्रश्‍नांची उत्तरं आपल्या अनोख्या हसऱ्या शैलीत देत करिना सगळ्यांनाच चकित करते. एका मुलाखतीदरम्यान प्रियांका चोप्रा म्हणाली होती की, तैमुरचे ओठ करिनासारखे आहेत आणि तो अतिशय गोंडस असा राजकुमार आहे.

तैमुरला जन्म दिल्यानंतर काही दिवसांतच करिनाने पुन्हा कामाला सुरुवात केलीय. तिच्या कम बॅकने बॉलिवूडमध्ये जणू पुन्हा चैतन्य पसरलंय. हो, अभिनेत्री करिना कपूर ही बॉलिवूडचं चैतन्य आहे. ती तिच्या असण्याने अशी काही जादू करते की बस्स; पण हल्ली ती जिथे जाते तिथे तिला तिच्या लाडक्‍या तैमुरबद्दलच प्रश्‍न विचारले जातायत. मग त्या प्रश्‍नांची उत्तरं आपल्या अनोख्या हसऱ्या शैलीत देत करिना सगळ्यांनाच चकित करते. एका मुलाखतीदरम्यान प्रियांका चोप्रा म्हणाली होती की, तैमुरचे ओठ करिनासारखे आहेत आणि तो अतिशय गोंडस असा राजकुमार आहे. प्रियांका असं म्हणाली हे करिनाला सांगण्यात आलं तेव्हा करिना म्हणाली, कुणीही भरभरून स्तुती करावी असाच आहे माझा तैमुर. तो अतिशय देखणा आणि गोजिरवाणा आहे. प्रियांका बोलली ते खरंच आहे. त्याचे ओठ माझ्याचसारखे आहेत. आपलं आईपण आणि अभिनेत्रीपण दोन्ही नीट सांभाळत करिना आपल्या अभिनयाची जादू करायला पुन्हा सज्ज झालीय. बॉलिवूडच्या या चैतन्याला शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात.  
 

Web Title: Taimur is the most gorgeous man, I have never been happier: Kareena Kapoor Khan