Taimur Ali Khan: 'कुणी मुळा घेतं का मुळा!' तैमुर झाला शेतकरी| Taimur White Dress Look Viral picking fresh Radish | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taimur Ali Khan

Taimur Ali Khan: 'कुणी मुळा घेतं का मुळा!' तैमुर झाला शेतकरी

Taimur Ali Khan Look Viral: बॉलीवूड स्टारकिड हे नेहमीच चर्चेत असतात. त्यात करिना सैफची मुलं तर जास्तच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. तैमुर हा नेहमीच नेटकऱ्य़ांचा आवडता विषय आहे. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक जास्त (Bollywood News) चर्चेत असणारा सेलिब्रेटी किड म्हणून तैमुरकडे पाहिले जाते. त्याचे फोटो मिळवण्यासाठी पापाराझ्झी कायम प्रयत्नशील असतात. आता तैमुरचा (Viral Video) एक हटके लूक व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तो चक्क शेतात उभा आहे. तैमुरच्या त्या लूकला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी अनेकदा तैमुर हा ट्रोल झाला होता. पतौडी पॅलेसच्या आवारातील त्या फोटोंना नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया देखील भन्नाट आहेत.

करिना आणि सैफ सुट्टीच्या निमित्तानं नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. सध्या ते त्यांच्याच पतौडी पॅलेसमध्ये आले आहेत. अशावेळी त्यांनी केलेले फोटोशुट चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे. नवाबजादे म्हणून सैफला ओळखले जाते. बॉलीवूडमधील सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रेटी अशी सैफची ख्याती आहे. केवळ चित्रपटातूनच नव्हे तर हॉटेलिंगमधून तो बक्कळ पैसा कमवत असल्याचे दिसून आले आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या या पिढीजात पॅलेसच्या मालकी हक्कावरुन वाद झाला होता. त्याची चर्चाही झाली होती.

पॅलेसच्या आवारात तैमुर, जेह, करिना यांनी भटकंतीचा मनसोक्त आनंद घेतला आहे. यावेळी तैमुरची 'फार्मर' अंदाजातील फोटोसाठी दिलेली पोझ नेटकऱ्यांना भलतीच भावली आहे. त्या फोटोंवर आलेल्या कमेंटस् तर भन्नाट आहेत. तैमुर आता शेतकरी झालाय याचा आम्हाला आनंदच आहे. मुळा विकणारा शेतकरी. अशा प्रतिक्रिया त्या फोटोंवर आल्या आहेत. करिनानं देखील त्या फोटोंवर कॅप्शन दिली आहे. त्यात ती लिहिते, 'गरम गरम मुली के पराठे...' तैमुरच्या त्या फोटोंवर पाच लाखांहून अधिक लाईक्स आले आहे. यावरुन तैमुरची लोकप्रियता दिसून येते.

हेही वाचा: मनात संशयाने घर केलंय? आनंद मूर्ती गणेशाकडून शिका या ५ गोष्टी!

तैमुरचा लूक नेटकऱ्यांना भावला आहे. अनेक नेटकरी त्याच्या प्रेमात पडले आहे. घरच्या शेतातील मुळे आणले असून आम्ही त्याचे पराठे बनवणार आहोत. असे करिनानं म्हटले आहे. 27 ऑगस्टला सैफ आणि करिनानं मुंबई सोडून पतौडी पॅलेसला प्रयाण केले. आऊटिंग करणे हे या दोन्ही सेलिब्रेटींची विशेष आवड आहे.

हेही वाचा: लालबागचा राजा आणि आदेश बांदेकरांच्या शिवसेना प्रवेशाचं कनेक्शन, वाचा Exclusive मुलाखत

Web Title: Taimur White Dress Look Viral Picking Fresh Radish Kareena Share Post Caption Reaction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..