'जय भीम' सिनेमाची ऑस्कर झेप;जगभरात 'सूर्या' चा बोलबाला

टी. जे. ज्ञानवेल दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांपासून समिक्षकांपर्यंत सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे.
'Jay Bhim' Movie Poster Image
'Jay Bhim' Movie Poster ImageGoogle

एखाद्या सिनेमाला पुरस्कारानं गौरविलं जाणं ही खूप मानाची गोष्ट. पण अनेकदा चांगले सिनेमे या पुरस्कारांपासून वंचित राहतात किंवा अनेक कलाकारांच्या बाबतीतही असे घडताना आपण पाहिलं असेल. पण प्रेक्षकांपासून समिक्षकांपर्यंत साऱ्यांनीच गौरविलेल्या सिनेमाला जगातील सगळ्यात मानाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळतं तेव्हा तो आनंद काही औरच असतो. त्यात जगात नंबर वनच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी जर नामांकन मिळत असेल तर त्या सिनेमाचा मान हा कैकपटीनं वाढतो. त्यात आपल्या भारतातून एखादा सिनेमा ऑस्करसाठी निवडला जावा हा तर समस्त भारतवासियांसाठी आनंदाचा क्षण. असाच एक भारतभर चर्चा झालेला टी.जे.ज्ञानवेल दिग्दर्शित जय भीम(Jay Bhim) या सिनेमाचा डंका आता परदेशातही वाजतोय. 'जय भीम' सिनेमा आता थेट ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. जय भीमसोबत प्रियदर्शन दिग्दर्शित 'मरक्कर' या दाक्षिणात्य सिनेमाचादेखील 94 व्या ऑस्कर (Oscar Award) पुरस्कार स्पर्धेत प्रवेश झाला आहे. जय भीम सिनेमाने अतिशय वेगळ्या आणि दुर्लक्षित अशा विषयाला हाताळलेले आहे. याच कारणामुळे या सिनेमाची देशभरात चर्चा झाली. मात्र आता हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला असून हेच या सिनेमाचे यश आहे, असे म्हटले जात आहे.

'Jay Bhim' Movie Poster Image
आणि हिंदी 'बिग बॉस 15' चा विनर आहे'....'; एका स्पर्धकानेच दिले संकेत

यावेळी जगभरातील 276 चित्रपट ‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी खुल्या विभागात स्पर्धेत आहेत. या यादीत ‘जय भीम’ आणि ‘मरक्कर’ सिनेमांचाही समावेश आहे. ‘जय भीम’ हा तमिळ सिनेमा भारतात 2 नोव्हेंबर 2021 रोजी ओटीटीवर प्रदर्शित झालेला आहे. चित्रपटाचे कथानक 90 च्या दशकातील तमिळनाडूमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. दाक्षिणात्य अभिनेता 'सूर्या' यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. प्रदर्शनानंतर हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राजकीय वादालाही या चित्रपटाला तोंड द्यावे लागले होते. तमिळनाडूतील आदिवासींना न्याय मिळवून देणाऱ्या वकिलाची ही कथा आहे.

'Jay Bhim' Movie Poster Image
रितेश-जेनेलियाच्या आयुष्यात वादळाची घंटा;अभिनेत्याने स्वतः सांगितले...

तसेच प्रियदर्शन दिग्दर्शित आणि मोहनलाल अभिनित ‘मरक्कर’ या राष्ट्रीय सिनेमा पुरस्कार विजेत्या सिनेमाचाही ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत समावेश झाला आहे. खुल्या विभागात निवड झालेल्या 276 सिनेमांची यादी ऑस्करच्या संकेतस्थळावर गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात या दोन्ही चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी नामांकन मिळवणाऱ्या चित्रपटांची अंतिम यादी 8 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com