ट्रेलर: जेव्हा राजकारणात होईल चाणक्यनितीचा वापर तेव्हा होईल 'तांडव'

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 4 January 2021

'तांडव'च्या ट्रेलरमध्ये पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी होणारी ही रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

मुंबई- सैफ अली खानच्या ज्या वेबसिरीजची चाहते आतुरतेने वाट पाहत होते त्या 'तांडव' या वेबसिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये सत्तेच्या लालचेपोटी रचलेल्या राजकारणाची झलक दिसून येत आहे. यासोबतंच सैफ अली खान आणि डिंपल कपाडिया यांच्या जबरदस्त भूमिकेची झलक देखील सादर केली गेली आहे. 

हे ही वाचा: 'बिग बॉस १४' मधून 'या' स्पर्धकाला दाखवला गेला बाहेरचा रस्ता, प्रेक्षकही गोंधळात  

'तांडव'च्या ट्रेलरमध्ये पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी होणारी ही रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सत्तेत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची नजर पंतप्रधानाच्या पदावर आहे जे मिळवण्यासाठी ते कोणती सीमा पार करु शकतात हे मात्र सिरीज रिलीज झाल्यावरंच समोर येईल. या वेबसिरीजमध्ये सैफ अली खान समर प्रतापसिंहच्या भूमिकेत आहे जो पंतप्रधान बनण्याची आशा बाळगुन आहे. तर डिंपल कपाडियाची देखील जबरदस्त भूमिका यात दिसून येत आहे. 

ऍमेझॉन प्राईमच्या या वेबसिरीजमध्ये सैफ, डिंपल कपाडिया यांच्याव्यतिरिक्त सुनील ग्रोवर, अयूब खान, तिग्मांशू धूलिया, कुमुद मिश्रा, सारा जेन डियास, डिनो मोर्या, गौहर खान, अनूप सोनी, कृतीका कामरा, हितेन तेजवानी, अमायरा दस्तूर देखील महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. १५ जानेवारी रोजी ही वेबसिरीज ऍमेझॉन प्राईमवर रिलीज होईल. 

सैफ अली खानच्या 'तांडव' या वेबसिरीजची खूप चर्चा आहे. सैफने त्याच्या मागच्या ओटीटी परफॉर्मन्सने चाहत्यांची मनं जिंकली होती याच कारणामुळे चाहते 'तांडव'साठी देखील तितकेच उत्सुक दिसून येत आहेत. आता तर या सिरीजचा ट्रेलर समोर आल्यानंतर लोकांनी रिऍक्शन द्यायला देखील सुरुवात केली आहे.   

tandav trailer released saif ali khan dimple kapadia politics series  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tandav trailer released saif ali khan dimple kapadia politics series