esakal | "सेलिब्रिटी असण्याचे तोटे अनेक"; आर्यन खान प्रकरणावर तापसीची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

taapsee pannu

"पब्लिक फिगर असल्याची ही किंमत मोजावी लागते"

Aryan Khan Case: देशाच्या कायद्यानुसार तुम्हाला वागावं लागेल- तापसी पन्नू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये आर्यन खानची खान Aryan Khan चर्चा आहे. आर्यनच्या प्रकरणावर अनेक सेलिब्रिटींनी आपले मत मांडले आहे. आता यावर अभिनेत्री तापसी पन्नूनेदेखील Tapsee Pannu आपले मत व्यक्त केले आहे. 'एका प्रभावशाली कुटुंबाचा भाग असणे हे एखाद्या दडपणापेक्षा कमी नाही', असे ती म्हणाली. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला आर्यन याचा जामीन अर्ज मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी फेटाळला. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर आर्यनची आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली.

एका मुलाखतीत या प्रकरणाविषयी बोलताना तापसी म्हणाली, "स्टारडम मिळवल्यानंतर अभिनेता आणि त्याच्या कुटुंबाला घडणाऱ्या पुढील गोष्टींची पूर्णपणे कल्पना असते. पब्लिक फिगर असल्याची ही किंमत मोजावी लागते आणि याला प्रत्येक प्रभावशाली किंवा प्रसिद्ध व्यक्तीला सामोरं जावं लागतं, मग ते त्यांना आवडत असो किंवा नसो. स्टार असल्याने काही सकारात्मक गोष्टींचा तुम्ही आनंद घेता, पण स्टारडमसोबत काही नकारात्मक गोष्टीसुद्धा सहन कराव्या लागतात. बरोबर ना?"

हेही वाचा: आर्यनला जामीन न मिळाल्याने गौरी खानला अश्रू अनावर; व्हिडीओ व्हायरल

“मला वाटतं की स्टारडमसह येणाऱ्या नकारात्मक गोष्टींची जाणीव सेलिब्रिटींना असते. कहां से आया पता नही चला' (ते कोठून आले ते माहित नाही) असे म्हणूच शकत नाही. मला खात्री आहे की ज्या गोष्टी पुढे घडणार आहेत त्याचे परिणाम त्यांना माहित असतील. आपल्या देशाचा जो कायदा आहे, त्यानुसार तुम्हाला वागावं लागेल,”ती पुढे म्हणाली.

हेही वाचा: Drugs Case: अशी होती आर्यन खानची तुरुंगातील पहिली रात्र

गेल्या आठवड्याभरात शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांना इंडस्ट्रीतील मित्रांकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे. सलमान खान, त्याची बहीण अलविरा खान अग्निहोत्री, महिप कपूर, नीलम कोठारी आणि सीमा खान यांनी मन्नत या निवासस्थानी दोघांची भेट घेतली तर पूजा भट्ट, सुझान खान आणि हंसल मेहता यांसारख्या इतर अनेक स्टार्सनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. हृतिक रोशनने इन्स्टाग्रामवर आर्यन खानला उद्देशून खुले पत्रही लिहिले.

loading image
go to top