
गोगीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आपला तपास सुरु केला आहे. मात्र यासगळ्या प्रकरणात समयच्या कुटुंबीयांना त्याच्या जीवाची भीती वाटत आहे, पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई - तारक मेहता का उल्टा चष्मा' या विनोदी मालिकेत गोगीची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाह याला काही गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे त्याचे कुटूंबिय चिंतेत आहे. याप्रकरणी समयने मुंबईच्या बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आता त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आपला तपास सुरु केला आहे. मात्र यासगळ्या प्रकरणात समयच्या कुटुंबीयांना त्याच्या जीवाची भीती वाटत आहे, पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. समय शाहने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, घराजवळ कधी एक गुंड तर कधी गुंडांचा ग्रुप मिळून त्याला शिवीगाळ करायचे आणि त्याला जीवे मारण्याची धमकी द्यायचे.
‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिका बंद करा'; कथानकाबाबत आक्षेप
काही दिवसांपूर्वी समय शूटिंगहून घरी परतत असताना त्याला या गुंडांनी रोखले आणि त्याला शिवीगाळ करू लागले. समयने घटनास्थळावरुन पोलिसांना फोन केला असता, पोलिस तिथे पोहोचेपर्यंत गुंडांनी तेथून पळ काढला. मात्र जाताना ‘तुला पाहून घेऊ’ अशी धमकी त्याला दिली.
तीन महिन्याचा 'छोटा हार्दिक पांड्या' पाहिलायं, कसला क्युट दिसतोयं..
धमकी देणारे लोक कोण आहेत आणि ते असे का करत आहेत, याची काहीच माहिती नसल्याचे समयने सांगितले आहे. इमारतीचे काही सीसीटीव्ही फुटेज त्याने पोलिसांना सोपवले आहे. मागील 15 दिवसांत तीन दान या टोळीने धमकावल्याचे आणि शिवीगाळ केल्याचे समयने पोलिसांना सांगितले आहे. याबाबत समयची आई नीमा शहा म्हणाल्या, "कोरोनामुळे सध्या आमचा ड्रायव्हर मुंबईत नाहीये. त्यामुळे शूटिंगवर समय खासगी कॅबमधून येतो जातो. म्हणूनच त्यांना आपल्या मुलाबद्दल खूपच चिंता आहे. सीसीटीव्हीमध्ये चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे आणि पुढच्या वेळी असे काही घडल्यास तत्काळ कळवण्यास सांगितले आहे.''