मोदींनी हात जोडून मागितली राज ठाकरेंची माफी

वृत्तसंस्था
Thursday, 5 March 2020

'तारक'मध्ये एक चंपक चाचांचा एक डायलॉग होता, की 'हिंदी ही मुंबईची भाषा आहे.' या डायलॉगवर मनसेने आक्षेप घेतला होता.

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील वयस्कर व्यक्तिरेखा चंपक चाचा यांच्या एका डायलॉगमुळे हिंदी-मराठी असा वाद सुरू झाला होता. यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. आज (ता. ५) मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी आणि कलाकार अमित भट्ट यांनी मनसे कार्यकर्त्यांची हात जोडून माफी मागितली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

'तारक'मध्ये एक चंपक चाचांचा एक डायलॉग होता, की 'हिंदी ही मुंबईची भाषा आहे.' या डायलॉगवर मनसेने आक्षेप घेतला होता. तर हिंदी नाही तर मराठी ही मुंबईची भाषा आहे असे मनसेचे म्हणणे होते. यावर निर्मात्यांनी व कलाकारांनी माफी मागावी अशी मागणी मनसेने केली होती, त्यामुळे अमित भट्ट यांनी लिखित स्वरूपात मनसेची माफी मागितली आहे. यात त्यांनी म्हणले आहे की, ते समोर आलेली स्क्रीप्ट वाचतात व लेखक जे सांगतात तेच डयलॉग म्हणावे लागतात. मी मराठी भाषेचा आदर करतो व मालिकेत जो डयलॉग माझ्या तोंडून गेला यासाठी मी क्षमा मागतो, असे त्यांनी लिखित स्वरूपात सांगितले. 

'राहुलजी, इटलीहून परतला आहात; कोरोनाची टेस्ट केली का?'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tarak Mehta Ka Ooltah Chashma artist apologize to MNS on dispute of Hindi Dialogue