Sacred Games 2 : 'सॅक्रेड गेम्स' परत येतोय?

वृत्तसंस्था
सोमवार, 1 एप्रिल 2019

मुंबई : नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरीज 'सॅक्रेड गेम्स'चा सिक्वेल पुन्हा एकदा धमाल उडवून द्यायला येणार आहे. सोशल मीडियावर त्यांनी आज (ता. 1) 'सॅक्रेड गेम्स 2'चे टीझर प्रदर्शित केले आहे. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने याबाबत अधिकृत घोषणा केली होती.

काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने या सिक्वलची घोषणा केली होती. तर आता आज टीझर प्रदर्शित करून त्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवली आहे. या टीझरमध्ये कोटेकर, बंटी आणि कुक्कु यांची झलक बघायला मिळत आहे. नेहमीप्रमाणेच रहस्यमयी असे या टीझरचे स्वरूप आहे. तर या टीझरमध्ये 'सॅक्रेड गेम्स 2'च्या एपिसोड्सची नावेही बघायला मिळत आहेत. 

'बिदल-ए-गीता', 'कथम अस्ति', 'अन्तर महावन' आणि 'अनागमम्' अशी या एपिसोडची नावे या टीझरमध्ये दिसतात. पहिल्या सिझनमध्ये राहून गेलेल्या प्रश्नांची उत्तरे या सिझनमध्ये मिळतील का, की आणखी काही नवीन रहस्य या सिझनमध्ये असतील याची उत्सुकता या प्रेक्षकांना असेल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teaser released of sacred games sequel