‘वेडिंगचा शिनेमा’चा धमाल टीझर लॉन्च

Wedding-cha-Shinema-Teaser
Wedding-cha-Shinema-Teaser

मुंबई: बहुप्रतीक्षित अशा डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला. पारंपारिक रितीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 

या टीझरमध्ये लग्नापूर्वी करण्यात येणारे चित्रीकरण, त्याची छोटेखानी फिल्म, संगीत सोहळा यांची झलक पाहायला मिळते. मराठीतील आघाडीचे आणि कसदार अभिनेते, त्यांना मिळालेली तेवढीच सशक्त पटकथा आणि चुरचुरीत संवाद मनोरंजनाची पूर्ण हमी देऊन जातात.

‘वेडिंगचा शिनेमा’च्या माध्यमातून मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीचे संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. हा चित्रपट 12 एप्रिलला महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. शिवराज वायचळ आणि रिचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे,संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत.

या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली आहे. प्रसन्न वातावरणात लग्न समारंभ रुपेरी पडद्यावर साकारतो. सलील कुलकर्णी यांनी कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल. ‘वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबीची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com