कंगनानं नवाजुद्दिन सिद्दिकीचा तो फोटो पोस्ट केला अन्...

तो फोटो 'टीकू वेड्स शेरू' या सिनेमाच्या सेटवरचा आहे.
Kangana Ranaut Post Nawazuddin Siddiqui's Photo
Kangana Ranaut Post Nawazuddin Siddiqui's PhotoInstagram

अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) आपल्या भूमिकांमुळे जितकी प्रसिद्ध आहे किंबहुना त्याहीपेक्षा अधिक ती तिच्या बेताल वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या वादांनी अधिक लक्षात राहते. सोशल मीडियावरही ती खूप अॅक्टिव्ह पहायला मिळते. ती नेहमीच आपले फोटे आणि व्हिडीओ शेअर करीत असते. आता तिने काही असे फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. कंगनानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीचे(Nawazuddin Siddiqui) दोन फोटो तिने शेअर केले आहेत. पण नवाजुद्दिनचा यातील गेटअप हा अगदीच वेगळा आहे. (Kangana Ranaut Post Nawazuddin Siddiqui's Photo)

Kangana Ranaut Post Nawazuddin Siddiqui's Photo
आराध्या बच्चन 'या' प्रसिद्ध कोरियन पॉप स्टारची कार्बन कॉपी!

नवाजुद्दिनने त्या फोटोत लहेंगा-चोली परिधान केलेली दिसत आहे. अर्थात तो एका स्त्री वेशभुषेत दिसत आहे. तो एका झगमगत्या लाइट्सने सजवलेल्या स्टेजवर उभा आहे. आणि त्याच्या आजुबाजूला नृत्य करण्यासाठी मुली उभ्या असलेल्या दिसत आहेत. या फोटोला शेअर करीत कंगनानं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,''सो हॉट!'' कंगनानं या स्टोरीला नवाजुद्दिन सिद्दिकीला देखील टॅग केलं आहे. हा फोटो 'टीकू वेड्स शेरू' या सिनेमाच्या सेटवरचा आहे. कंगनानं सिनेमाचं नाव कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. तिनं एका फोटोला ''बिजली गिराने मै हूं आई'' या श्रीदेवी यांच्या प्रसिद्ध गाण्याच्या ओळी लिहील्या आहेत. तो फोटो पाहून तर वाटत आहे की सिनेमातील कुठल्यातरी सीनसाठी नवाजुद्दिन सिद्दिकीने श्रीदेवी यांच्या लूकला फॉलो केलं आहे.

Kangana Ranaut Post Nawazuddin Siddiqui's Photo
Video:श्रद्धा कपूरने ऑटो राईडचा आनंद घेत केली मुंबईची सफर

कंगनानं गेल्या वर्षी 'टिकू वेड्स शेरू' या सिनेमाची घोषणा केली होती. सध्या या सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. कंगना या सिनेमाची निर्मिती करीत आहे. तर साई कबीर या सिनेमाचं दिग्दर्शन करीत आहे. काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दिनने मुंबईतील नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्या फोटोवर कंगनाने प्रतिक्रिया देताना अभिनेत्याचं अभिनंदन केलं होतं. तिने लिहिलं होतं,''नवाजुद्दिन सरांनी त्यांच घर स्वतः डिझाईन केलं आहे. त्यांचं घर खूप सुंदर आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com