Tejaswi Prakash अन् Karan Kundra च्या नात्याला लागली नजर? ब्रेकअप चर्चांवर तेजस्वीनं अखेर मौन सोडलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tejaswi prakash, karan kundra, tejaswi prakash wedding

Tejaswi Prakash अन् Karan Kundra च्या नात्याला लागली नजर? ब्रेकअप चर्चांवर तेजस्वीनं अखेर मौन सोडलं

Tejaswi Prakash News: टीव्हीचे लोकप्रिय लव्हबर्ड्स तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा. दोघे 'बिग बॉस 15' मध्ये सहभागी होते. बिग बॉसच्या घरातच दोघांची पहिली भेट झाली. 'बिग बॉस 15' या रिअॅलिटी शोमध्ये झाली होती.

घरातच दोघांची मैत्री झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. बिग बॉसच्या घरात दोघांनी एकमेकांचं रिलेशनशिप कबुल केलं. पण आता या दोघांच्या नात्याला कोणाची तरी नजर लागल्याचं बोललं जातंय.

(Tejaswi Prakash broken his silence on the breakup with karan kundra)

तेजस्वी आणि करण यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे करणने काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. या ट्विट मध्ये.. ना तेरी शान कम होती, ना रुबता कम होता, जो घमंड मैं कहा वही हस के कहा होता..

अशा पद्धतीचं ट्विट करणने केल्याने त्याच्या आणि तेजस्वीच्या नात्याला नजर लागली असल्याचं सांगितलं जात होतं. पण आता तेजस्वीने या सर्व अफवांवर मौन सोडलंय.

तेजस्वी प्रकाशने या सर्व चर्चा अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. तेजस्वी लिहिते. ती प्रेमात आहे, परंतु त्याबद्दल बोलणे टाळते, कारण ती काहीशी अंधश्रद्धाळू आहे.

तेजस्वी पुढे लिहिते.. "मला वाटते की मी माझ्या नात्याबद्दल जितके जास्त बोलेल तितके लोक तुमच्या आयुष्यातील सुंदर गोष्टींना नजर लावतील.."

असा खुलासा तेजस्वीने केला. त्यामुळे एकूणच तेजस्वीने तिच्या आणि करणच्या नात्याबद्दल गुपित ठेवलं आहे.

Tejaswi Prakash News

Tejaswi Prakash News

गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा लग्न करणार अशाही चर्चा सुरु होत्या. याविषयी तेजस्वी म्हणाली, जोपर्यंत असे काही होत नाही तोपर्यंत मी याबद्दल बोलणार नाही.

लग्न करणे ही माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते प्रत्यक्षात येईपर्यंत मला याबद्दल बोलायला आवडेल असे वाटत नाही. मला ते माझ्यासाठी गुपित ठेवायचे आहे. आम्ही दोघेही सध्या एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटतोय. असा खुलासा तेजस्वीने केला.

तेजस्वी काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मन कस्तुरी रे सिनेमात मुख्य भूमिकेत झळकली होती. या सिनेमात अभिनय बेर्डे तेजस्वीचा हिरो होता. तर करण कुंद्रा सध्या 'तेरे इश्क में घायाल' या मालिकेत झळकत आहे.

याशिवाय तेजस्वी 'नागिन 6' या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असून दोघांचं लग्न कधी होणार याची त्यांच्या फॅन्सना उत्सुकता आहे. तेजस्वीने 'बिग बॉस 15' चं विजेतेपद पटकावलं होतं

टॅग्स :Marathi News Bollywood