'माझा कधीही न पाहिलेला अंदाज'; तेजस्विनीच्या पोस्टची चर्चा

हे नक्की काय प्रकरण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती.
Tejaswini Pandit
Tejaswini Pandit Instagram

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही’ असं म्हणत अभिनेत्री आपल्या ओठांवरची लिपस्टिक पुसत ‘बॅन लिपस्टिक’चा (Ban Lipstick) संदेश देत होत्या. हे नक्की काय प्रकरण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अभिनेत्रींच्या या अशा व्हिडीओमुळे लोकांच्या मनात संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली होती. नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. अखेर या प्रश्नांचा उलगडा झाला असून त्याचं कारण स्पष्ट झालं आहे. संजय जाधव दिग्दर्शित 'अनुराधा' (Anuradha) ही ७ भागांची वेब सीरिज 'प्लॅनेट मराठी ओटीटी', व्हिस्टास मीडिया कॅपिटलवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्याच्याच प्रमोशनचा हा एक भाग होता.

या वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता या सर्व अभिनेत्री लिपस्टिकचं समर्थन का करत नाही, लिपस्टिकचा आणि या वेब सीरिजचा काय संबंध, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या वेब सीरिजमध्ये दडलेली आहेत. नुकताच या वेब सीरिजच्या पोस्टर आणि टिझर प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. टिझरमध्ये तेजस्विनीचा बोल्ड अंदाज दिसत असून तिच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा दिसत आहेत.

‘अनुराधा’च्या निमित्ताने संजय जाधव वेब सीरिजच्या विश्वात पदार्पण करत असून हिरालाल दाफडा आणि आकाश दाफडा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या वेब सीरिजचे लेखन संजय जाधव, वैभव चिंचळकर यांचं असून पंकज पडघम यांचं संगीत लाभलं आहे. तर संकलनाचं काम अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी पाहिलं असून कला दिग्दर्शक सतीश चिपकर आहेत. आपल्या या पहिल्या प्रोजेक्टबाबत दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, "आजवर अनेक चित्रपट केले आहेत. प्रथमच वेब सीरिज करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, यासाठी उत्सुकही आहे. एकंदरच संमिश्र मनःस्थिती आहे. आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या आवडत्या टीमसोबत मी नवीन प्रोजेक्ट करतोय. आशा आहे प्रेक्षकांना माझा हा नवा प्रयत्न नक्कीच आवडेल."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com