तेजस्विनीची बिग बींना अनोखी भेट 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जानेवारी 2018

संजय जाधव दिग्दर्शित "ये रे ये रे पैसा' चित्रपटाची टीम बिग बी अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेली होती. प्रत्येकानं त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या; पण तेजस्विनी पंडितकडे त्यांच्यासाठी एक खास गिफ्ट होतं. तेजस्विनी पंडित ही अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची मुलगी. तिची ही ओळख कितीतरी काळ लोकांना माहीतही नव्हती. तिच्या टॅलेंटवर तेजस्विनीनं स्वतःचं नाव कमावलं आहे. बिग बींची भेट घेतल्यावर तेजस्विनीनं त्यांच्या आईची एक व्हिडीओ क्‍लिप बिग बींना दाखविली, ज्यामध्ये तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना दिसत आहे. 1972 मध्ये एक नजर या बी. आर.

संजय जाधव दिग्दर्शित "ये रे ये रे पैसा' चित्रपटाची टीम बिग बी अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेली होती. प्रत्येकानं त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या; पण तेजस्विनी पंडितकडे त्यांच्यासाठी एक खास गिफ्ट होतं. तेजस्विनी पंडित ही अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची मुलगी. तिची ही ओळख कितीतरी काळ लोकांना माहीतही नव्हती. तिच्या टॅलेंटवर तेजस्विनीनं स्वतःचं नाव कमावलं आहे. बिग बींची भेट घेतल्यावर तेजस्विनीनं त्यांच्या आईची एक व्हिडीओ क्‍लिप बिग बींना दाखविली, ज्यामध्ये तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना दिसत आहे. 1972 मध्ये एक नजर या बी. आर. इशरा यांच्या चित्रपटात ज्योती चांदेकर यांनी अमिताभ यांच्या सावत्रआईची भूमिका केली होती. तेव्हा त्या अवघ्या 17 वर्षांच्या होत्या. तेजस्विनी या भेटीबद्दल सांगते की, स्वतःच्या आईचा व्हिडीओ अमिताभ बच्चन यांना दाखवणं आणि त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येईल हे पाहणं, हे सगळं वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत "मी हे फार आधी प्लॅन केलं होतं की जेव्हा मी अमिताभजींना भेटेन, तेव्हा मी त्यांना माझ्या आईसोबतचा त्यांचा हा व्हिडीओ नक्की दाखवणार. माझ्या आईचीही खूप इच्छा होती. पण, त्यांना भेटायला जाताना मी थोडी नर्व्हस होते. बिग बींकडे एवढा वेळ असेल का? एवढे मोठे कलाकार किती लोक त्यांना भेटत असतील. माझा हा व्हिडीओ पाहण्यात त्यांना कितपत रस असेल मला माहीत नव्हतं. म्हणून मी तिथे पोचल्यावर "ये रे ये रे पैसा'बाबतची चर्चा करून झाल्यावर त्यांची परवानगी घेतली आणि मग त्यांना हा व्हिडीओ दाखवला. माझ्या आईसोबत त्यांनी एका चित्रपटात काम केलंय हे मी सांगितल्यावर त्यांना कौतुक वाटलं. त्यांना चित्रपटाचं नाव आठवत नव्हतं. पण, हा एक सुंदर नॉस्टॅल्जिया दिल्याबद्दल त्यांनी मला थॅंक्‍स म्हटलं. त्यांनाही या गोष्टीचा खूप आनंद झाला." तेजस्विनीनं तिचे बाबाही अमिताभ यांचे मोठे फॅन आहेत आणि "कुली' चित्रपटाच्या वेळी जेव्हा बिग बींना अपघात झाला होता, तेव्हा परिस्थिती नसताना त्यांनी सिद्धिविनायकाला सोन्याच्या दुर्वा कशा वाहिल्या होत्या, तो प्रसंग सांगितला. 

फोटो सौजन्य - tejaswini pandit instagram

Web Title: tejaswini pandit meets amitabh bacchan