Tejaswini Pandit: "जनता मूर्ख नाहीये, बेईमानी ओळखते"; तेजस्विनीचा टोला नेमका कोणाला?

Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडितनं नुकतंच एक ट्वीट (X) शेअर केलं आहे. तिच्या या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
Tejaswini Pandit
Tejaswini Pandit

Tejaswini Pandit: अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट शेअर करते. राजकीय तसेच सामाजिक विषयांवर आधारित पोस्ट तेजस्विनी शेअर करते. आता तेजस्विनीनं नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

तेजस्विनी पंडितचं ट्वीट

तेजस्विनीनं ट्वीटमध्ये लिहिलं, "जनता मूर्ख नाही.सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे !" या ट्वीटमध्ये तेजस्विनीनं कोणाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आता या ट्वीटच्या माध्यमातून तेजस्विनीनं नेमका कोणाला टोला मारला आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

तेजस्विनीनं शेअर केलेल्या ट्वीटला कमेंट करुन काहींनी तेजस्विनीला ट्रोल केलं आहे. तर काहींनी मत मांडल्याबद्दल तिचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "ताईंनी (येत नसलेला) अभिनय सोडून सरळ राजकारणात यावे. उगाच कशाला उंटावरून शेळ्या हाकायच्या?" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "जनता मूर्ख नाही पण मूर्ख बनवलं जातंय..."

Tejaswini Pandit
Tejaswini Pandit: जिजाऊंच्या जयंतीनिमित्त नव्या सिनेमाची घोषणा, तेजस्विनी पंडित साकरणार आऊसाहेब

तेजस्विनीनं नव्या क्षेत्रात टाकलं पाऊल

तेजस्विनीनं काही दिवसांपूर्वी नव्या क्षेत्रात टाकलं पाऊल टाकलं. तिनं पुण्यात स्वत:चे मिडनाईट सलून सुरु केले आहे. या सलूनच्या उद्घाटनाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. "AM to AM युनिसेक्स सलून" असं तेजस्विनीच्या सलूनचं नाव आहे.

तेजस्विनीनं 'या' चित्रपटांमध्ये केलं काम

तेजस्विनीनं अगं बाई अरेच्चा या 2004 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मी सिंधूताई सपकाळ या चित्रपटात तेजस्विनीनं सिंधूताई सपकाळ यांची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली.

तेजस्विनीचा आगामी चित्रपट

तेजस्विनी लवकरच 'स्वराज्य कनिका जिजाऊ' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचं पोस्टर तेजस्विनीनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलं होतं. या पोस्टरला तिनं कॅप्शन दिलं, "॥ म्हणे जन्मावा शिवबा, आधी जिजाऊ घडाव्या लागतात ॥ “दिल्लीपती”कोण असावा हे रायगडावर बसून “हिंदुपती”ठरवणारा ज्यांनी छत्रपती घडविला. स्वराज्याचा वसा घेऊन प्रत्येक मराठी मनावर ठसा उमटवणार्‍या राजमाता जिजाऊसाहेबांना त्रिवार मुजरा व साष्टांग दंडवत"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com