
Tejaswini Pandit:'माझं आणि संजय जाधवचं अफेअर..',दिग्दर्शका सोबतच्या नात्यावर तेजस्विनीचा मोठा खुलासा
Tejaswini Pandit: सेलिब्रिटी म्हटलं तर गॉसिप त्यांच्या पाचवीला पुजलेलं असतं. आणि अर्थात लोकांनाही या सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा अधिक रस असतो ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यात. आता तर सोशल मीडियामुळे सेलिब्रिटींच्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी लोकांपर्यंत काही मिनिटात पोहोचतात.
कोण कोणाबरोबर कुठे दिसलं, हे दोघे लंचला एकत्र..ते दोघे रात्री पार्टीत एकत्र..याच्या सिनेमात हिच का सारखी...तर त्याच्या घरी तिची वरचेवर ये-जा...कोणी कोणावर काय कमेंट केली...या ना अशा अनेक बातम्या की अफवा काहीही म्हणा याला सगळेच चवीनं वाचतात...
यावरचे व्हायरल व्हिडीओ मागे-पुढे करुन सारखे पाहतात. आठवड्याला किमान असे दोन-तीन सेलिब्रिटी यामुळेच खरंतर ट्रेन्डिंगला दिसतात.
आता सध्या एका वक्तव्यामुळे आणि त्यामधनं झालेल्या खुलास्यामुळे अभिनेत्री तेजस्विनी पंडीत जोरदार चर्चेत आली आहे. तेजस्विनीचं 'दुनियादारी'चा दिग्दर्शक संजय जाधव सोबत अफेअर होतं ही बातमी काही दिवसांपासून जोर धरून होती.
यावर प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू झालेल्या 'पटलं तर घ्या' या नव्या कोऱ्या सेलिब्रिटी चॅट शो मधील एका सेगमेंट अंतर्गत तेजस्विनीला तिच्या आयुष्यातील वाईट अफवे विषयी विचारलं गेलं ..अन् मग काय तेजस्विनीनं मन मोकळं करत मोठा खुलासा केला.
आयुष्यातील बेस्ट आणि वाईट रुमर्ड या सेगमेंट मध्ये तेजस्विनी उत्तर देत म्हणाली,टटमाझं आणि संजय जाधवचं अफेअर आहे हे सगळ्यात वाईट रुमर्ड होतं माझ्यासाठी. कारण संजय जाधव माझा दादा आहे. आणि माझ्यासाठी आयुष्यातील आतापर्यंतचं हे सगळ्यात वाईट रुमर्ड आहे. आमच्यातील नातं इतकं घट्ट आहे की मला तो त्याची मुलगी द्वितीसारखं वागवतो. आणि मग असं असताना आमच्याविषयीची ही अफवा किती चुकीची आहे''. हे उत्तर देताना तेजस्विनीनं एकप्रकारे आपल्या मनातील संताप व्यक्त केला. अभिनेत्रीच्या या उत्तरानं सगळेच हैराण झाले आहेत.
तेजस्विनी पंडीत आता केवळ अभिनेत्री नाही तर निर्माती म्हणूनही मराठी इंडस्ट्रीत ओळखली जाते. तेजस्विनीनं आतापर्यंत 'पॉंडिचेरी','चंद्रमुखी', 'अथांग' आणि 'बांबू' सिनेमाची निर्मिती केली आहे. 'बांबू' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि सर्वत्र त्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. वेगळं कथानक हा तिच्या सिनेमांचा आतापर्यंतचा युएसपी राहिला आहे.