esakal | तेजस्विनीने केले रक्तदान; सांगितली बाबांनी दिलेली शिकवण
sakal

बोलून बातमी शोधा

Tejaswini Pandit

तेजस्विनीने केले रक्तदान; सांगितली बाबांनी दिलेली शिकवण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वैद्यकिय सुविधांची कमतरता भासत आहे. अनेक रूग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत. तर रक्तपेठीतदेखील रक्ताची कमतरता भासत आहे. त्यामुळे सरकारने नागरिकांना लस घेण्याआधी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला अभिनेत्री तेजस्विनी पंडितने प्रतिसाद दिला आहे. नुकतंच तेजस्विनीने रक्तदान केले आहे. रक्तदान करतानाचे फोटो तेजस्विनीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

तेजस्विनीने रक्तदान केल्यामुळे तिचे सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले आहे. या पोस्टला कॅप्शन देत तिने सांगितले की रक्तदान करण्याची तसेच कोणतेही समाजकार्य कार्याची प्रेरणा तिला तिच्या वडिलांकडून मिळाली आहे. तेजस्विनीने या पोस्टला कॅप्शन दिले, ‘अभिमानाने आरशात बघता आलं पाहिजे, असं माझे बाबा म्हणायचे. झाकल्या मुठीने मदत केली की लोक म्हणणार तुम्ही काहीच करत नाही. केलेली मदत दाखवली की म्हणणार पब्लिसिटीसाठी केली. जमेल तशी केली की म्हणणार एवढीशी का केली? पण ‘तेवढीशी' का होईना केली ना, किमान हातावर हात धरून तर नाही बसलो! समाजकल्याण करताना कॅमेरा घरी ठेवायचा (ही पण माझ्या बाबांची शिकवण) पण आजच्या डिजिटल युगात जाहीर करावं लागतं. कारण कलाकार कॅमेराच्या मागेही अभिनयच करत असतो असं बहुतेकांना वाटतं. पण तसं नाही. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो याची जाण मला एक कलाकार म्हणून आहे, कारण मुळात कलाकार हा संवेदनशीलच असतो. समाजातील एकाला जरी माझ्या ह्या कृतीतून प्रेरणा मिळाली तरी माणूस म्हणून काहीतरी करू शकले याचं समाधान असेल. आपण चांगलं कर्म करत रहायचं. त्याची नोंद बाकी कुठे नाही, तरी ‘तिथे वर’ होत असते. तेव्हा, मला जमेल तसं, जमेल तेव्हा झाकल्या मुठीने (जसं गेले अनेक वर्ष करत आले) आणि आता जमेल तेव्हा जाहीर करून मदत करत राहीन. कारण मी आजही ‘स्वतःला अभिमानाने आरशात बघते’. या पोस्टमध्ये तेजस्विनीने रक्तदान करतानाचे आणि त्यानंतर मिळालेल्या प्रशस्तिपत्रकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा : 'इतिहासात आपल्या पिढीची नोंद ही..'; निर्बंधांचं पालन न करणाऱ्यांना सुबोधने फटकारलं

काही दिवसांपूर्वी तेजस्विनीने कोरोना आणि त्यामागे चालेले राजकारण या संदर्भात एक पोस्ट सोशल मीडियीवर शेअर केली होती. त्यामुळे ती चर्चेत आली होती.

loading image