esakal | Video : 'समांतर २'चा टीझर; कुमारच्या आयुष्यात पुढे काय घडणार?
sakal

बोलून बातमी शोधा

samantar 2

Video : 'समांतर २'चा टीझर; कुमारच्या आयुष्यात पुढे काय घडणार?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. भविष्यात डोकावणं अनेकांनाच आवडत असतं. पण जर एखाद्या व्यक्तीसमोर त्याचा भविष्यकाळ प्रत्यक्षात कुणी जगत असेल तर? अशाच कथानकावर आधारित एमएक्स प्लेअरवर 'समांतर' Samantar ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता 'समांतर २'ची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. नुकताच दुसऱ्या सिझनचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने Tejaswini Pandit सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे. त्याचप्रमाणे या सीरिजचा ट्रेलर येत्या २१ जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचं तिने सांगितलंय. (tejaswini pandit swwapnil joshi starrer samantar 2 teaser released)

समीर विद्वांस दिग्दर्शित या सीरिजमध्ये स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, नितीश भारद्वाज यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'दोन काळ, दोन व्यक्ती आणि एक रहस्य! पहा पुढे काय घडणार कुमारच्या आयुष्यात', असं कॅप्शन तेजस्विनीने या व्हिडीओला दिलं आहे. 'समांतर'मध्ये अभिनेत्री तेजस्विनीने स्वप्निल जोशी अर्थात कुमार महाजनच्या पत्नीची भूमिका साकारली होती. पण शेवटच्या भागात आणखी एका बाईची एंट्री होते. तर ही बाई कोण असेल याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

हेही वाचा: 'ही' मालिका ठरली महाराष्ट्राची नंबर १ मालिका

हेही वाचा: आजोबा अरुण गवळी नातीच्या भेटीला; फोटो व्हायरल

सुहास शिरवळकर यांच्या 'समांतर' या नावाच्या कादंबरीवर आधारित ही वेब सीरिज आहे. पहिल्या सिझनचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं होतं. नऊ भागांची ही सीरिज होती. आता दुसऱ्या सिझनचं दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केलं आहे.

loading image