तेजस्विनीची लूजरवाली गरबा स्टेप झाली व्हायरल!

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

नवरात्री म्हटलं कि फिल्म इंडस्ट्रीच एक वेगळंच सेलेब्रेशन असतं. मराठी सेलेब्स हि यात मागे राहत नाहीत. स्वतःच्या सोशल मीडियापासून ते टेलिव्हिजन चॅनेल्स पर्यंत मराठी तारेतारकांच नवरात्री सेलेब्रेशन जोरात सुरु असतं. परंतु मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या सेलेब्रेशनमध्ये एक वरची लेवल गाठली आहे.

मुंबई : नवरात्री म्हटलं कि फिल्म इंडस्ट्रीच एक वेगळंच सेलेब्रेशन असतं. मराठी सेलेब्स हि यात मागे राहत नाहीत. स्वतःच्या सोशल मीडियापासून ते टेलिव्हिजन चॅनेल्स पर्यंत मराठी तारेतारकांच नवरात्री सेलेब्रेशन जोरात सुरु असतं. परंतु मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या सेलेब्रेशनमध्ये एक वरची लेवल गाठली आहे.

व्हिडीओ पहा..

तेजस्वनीच म्हणणं असं कि - नटून थटून, सुंदर साज लेवून आणि खूप अदाकारी दाखवत प्रत्येकजण  गरबा खेळतोच पण ह्या खेळाडूंमध्ये असे नक्कीच असतात ज्यांना हा गरबा जमत नाही पण आवड म्हणून ते गरबा खूप एन्जॉय करतात आणि अशाच लोकांच्या गरबा स्टेप्स लोकांच्या कायम लक्षात राहतात. तेजस्विनीने अशाच गरबा स्टेप्स ना घेऊन एक challenge सुरु केलं - loserwaligarbastep (लूजरवाली गरबा स्टेप) ज्यात तिने तिची आवडती लूजरवली गरबा स्टेप करून दाखवली आणि त्याचा व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडियावर टाकला. एका दिवसात ह्या व्हिडीओने लाखात views कमावले!

अर्थात, Like, Share आणि Comments च्या माध्यमातून लोकांनी या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद दिला आहे. तेजस्विनीने ह्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधव आणि नम्रता आवटे ह्या दोन कलाकारांना #loserwaligarbastep करून दाखवण्याचे Challenge दिलं आहे. अपेक्षा आहे कि त्यांचे व्हिडीओज ही लवकरच त्यांच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतील.

Web Title: tejaswini pandit video viral esakal news