

Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडित या मराठी अभिनेत्रीचे चाहते महाराष्ट्रभरात आहेत. तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचेही अनेकजण वेडे आहेत. अशाच एका वेड्या चाहत्याचा अनुभव अभिनेत्रीला नुकताच सांगलीतील एका कार्यक्रमात आला आहे.
तेजस्विनी तिथे तरुणाईशी मुक्त संवाद साधण्यासाठी गेली होती. विषय होता अभिनय क्षेत्रातील आव्हानं आणि संधी. या मुक्त संवादा दरम्यानच समोर जमलेल्या तरुणांमधील एकानं हिम्म्त करत मोठ्यानं तेजस्विनीला 'आय लव्ह यू' म्हणत साद घातली आणि एकच गोंधळ माजला.
अर्थात ही आय लव्ह यू ची साद ऐकल्यावर तेजस्विनी देखील जागीच थबकली.(Tejaswini Pandit: Young Fan propose tejaswini pandit in public programme)
मिरज येथील अंबाबाई तालीम संस्थेच्या एसबीजी आय ग्रुप इन्स्टिट्युटच्या स्नेह संमेलनानिमित्त अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं उपस्थित तरुणांशी मुक्त संवाद साधला. तसंच,यावेळी 'रानबाजार' फेम अभिनेत्रीनं विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्न्नांना मनमोकळेपणानं उत्तरं दिली.
कलाकारांच्या बाबतीत या अशा गोष्टी अनेकदा घडत असतात. त्यांना त्यांच्या चाहत्यांचे काही चांगले आणि काही वाईट अनुभव येतच असतात. तसंच अनेकदा आपल्या आवडत्या कलाकारांचे अगदी घराचे पत्तेही चाहते शोधून काढतात आणि कधी पत्र, कधी फुलांचा बुके,कधी गिफ्ट्स अशा अनेक गोष्टी पाठवत असतात.
अनेकदा चाहत्यांचे हे प्रेम इतकी हद्द ओलांडतात की कलाकारांना त्याचा त्रासही होतो. आता तेजस्विनीला भर कार्यक्रमात आय लव्ह यू म्हणणाऱ्या चाहत्यानं पुढे काही जास्त केलं नाही हे चांगलंच झालं म्हणायचं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.