Big Boss16: म्हणून सलमाननं शिव ठाकरेला बिगबॉसचं निमंत्रण दिलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss16
salman khan 
Shiv Thakare

Big Boss16: म्हणून सलमाननं शिव ठाकरेला बिगबॉसचं निमंत्रण दिलं!

बिग बॉस हा टिव्ही जगतातील लोकप्रिय शो आहे. आता हा शो चांगलाच गाजला आहे. साजिद प्रियंका किंवा शालिन यांचा भांडणाने शो चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र या शोमधील अब्दु आणि शिव या दोघांना प्रेक्षकांच्या मनात जागा बनविण्यात यश आलं आहे. त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळत आहे.

हेही वाचा: Big Boss 16: अन् सलमान संतापला! अब्दू रोजिक बिग बॉस बाहेर?

'बिग बॉस मराठी २' जिंकल्यानंतर तो अवघ्या महाराष्ट्राचा लाडका बनला आता तो 'बिग बॉस १६' मध्ये त्याचा दमादार खेळ दाखवतोय. शिव प्रेक्षकांचाच नाही तर बॉलिवूडचा भाइजान सलमान खानचा देखील आवडता बनला आहे.

मात्र 'बिग बॉस १६' मध्ये येण्यापूर्वीच सलमान शिवचा फॅन झाला होता. शिव आणि सलमानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिव आणि सलमान या सिझनपूर्वीही भेटले आहे विशेष म्हणजे ते ही बिग बॉसमध्येच.. सलमानने 'बिग बॉस मराठी २' च्या शोला भेट दिली होती. तेव्हा स्वतः महेश मांजरेकर यांनी शिवची ओळख सलमानसोबत करून दिली होती. या व्हिडिओमध्ये मांजरेकर म्हणतात, 'हा आहे शिव ठाकरे. रोडीज खेळून आलाय.' त्यावर सलमान म्हणतो, 'अरे हा तर एकदम तरबेज माणूस आहे. हा प्रत्येक सिझन पाहतो आणि त्याला माहितीये कसं खेळायचंय. तो गावाकडचा प्रेमळ माणूस आहे. रोडीज खेळल्यानंतरही तो तसाच आहे का? असं विचारलं त्यावर शिव हो असं उत्तर देतो.

हेही वाचा: Bigg Boss 16: 169 गर्लफ्रेंड असलेला शिव ठाकरे बिग बॉसच्या घरात पडला प्रेमात?

यावरुनचं दिसतंय की शिवने सलमानला पहिल्या भेटीतच इप्रेंस केलं होतं. बिग बॉसमध्ये आल्यानंतर त्याने हळुहळू सर्व प्रेंक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. त्यानंतर त्याला कॅप्टन्सीही देण्यात आली होती. त्यामूळे शोमध्ये शिवचे पारडे जड दिसतेय.