प्रसिद्ध अभिनेत्री गायत्रीचा अपघात, 26 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली हिचा भीषण (Telugu actress Gayathri AKA Dolly D Cruze) अपघातात मृत्यु झाल्याची बातमी (Car Accident) समोर आली आहे.
Actress Gayathri Aka Dolly D Cruze
Actress Gayathri Aka Dolly D Cruzeesakal
Updated on

Tollywood News: टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली हिचा भीषण (Telugu actress Gayathri AKA Dolly D Cruze) अपघातात मृत्यु झाल्याची बातमी (Car Accident) समोर आली आहे. उपचारादरम्यान तिनं अखेरचा श्वास घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी तिचं निधन झालं आहे. आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं लाखो चाहत्यांची पसंती मिळवणाऱ्या (Entertainment News) अभिनेत्रींमध्ये गाय़त्रीचं नाव घ्यावं लागेल. तिच्या निधनाचे वृत्त कळताच गायत्रीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. टॉलीवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी देखील (Bollywood News) गायत्रीच्या कुटूंबियाप्रती सहानुभूती दर्शवली आहे.

टॉलीवूडमध्ये गायत्री ही डॉली डिक्रुझ (Telugu actress Gayathri AKA Dolly D Cruze ) या नावानं ओळखली जायची. तिचा कार अपघातात मृत्यु झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, होळीच्या दिवशी एका कार्यक्रमावरुन घरी परताना तिच्या कारला अपघातात झाला. तो अपघात एवढा भीषण होता की, त्यातच तिचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले आहे. तिची कार एका डिव्हायरडला जावून धडकली. ती तिच्या मित्रासमवेत प्रवास करीत होती. त्या मित्राचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यु झाला. गायत्रीच्या टीव्ही मनोरंजन प्रवासाविषयी सांगायचे झाल्यास, तिनं मॅडम सर मॅडम या तेलुगू वेबसीरिजमधून तिला अमाप लोकप्रियता मिळाली.

Actress Gayathri Aka Dolly D Cruze
Movie Review: बच्चन पांडे पाहायला जातायं, पण, तो तर...

गायत्रीचा फॅन फॉलोअर्सही मोठा होता. ती सोशल मीडियावरही सक्रिय असणारी अभिनेत्री होती. तिनं आपला युट्युब चॅनलमधून चाहत्यांची दाद मिळवली होती. गायत्रीच्या निधनानंतर आता दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामध्ये तिची सह अभिनेत्री मैत्रीण सुरेखा वाणीनं सोशल मीडियावर लिहिलं आहे की, तिचं जाणं हे माझ्या धक्कादायक होतं. एक मुलगी आपल्या आईला सोडून गेली आहे. माझ्यासाठी हे वेदनादायी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com