'जर्सी' सिनेमातील शाहिदचे चौकार-षटकार पाहून पहा काय म्हणालाय साऊथ सुपरस्टार Shahid Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahid Kapoor

'जर्सी' सिनेमातील शाहिदचे चौकार-षटकार पाहून पहा काय म्हणालाय साऊथ सुपरस्टार

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर(Shahid Kapoor)च्या 'जर्सी'(Jersey) सिनेमाचं कोरोनामुळे अनेकदा प्रदर्शन लांबणीवर पडलं असलं तरी अखेर सिनेमाला मुहूर्त मिळालाच. शाहिदनं सिनेमात अभिनयाच्या माध्यमातून मारलेले चौकार-षटकार त्याला यश मिळवून देतील असं चित्र सध्या सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून वाटत आहे. सिनेमाचीच नाही तर संपूर्ण सिनेमाच्या टीमची प्रशंसा करणारं एक ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. त्यातील प्रतिक्रिया सिनेमाच्या टीमसाठी खास ठरत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेलं ते ट्वीट कोणाचं आहे बरं?.

हेही वाचा: 'नाहीतर ते मला मारुन टाकेल...' करण जोहरचं धक्कादायक वक्तव्य

'जर्सी'च्या तेलुगु(Telugu) व्हर्जनचा मुख्य अभिनेता नानी(Nani)नं शाहिद कपूर अभिनित हिंदी(Hindi) 'जर्सी' सिनेमाची मनापासून प्रशंसा केली आहे. शाहिदच नाही तर त्यानं संपूर्ण टीमच्या कामाचं कौतूक केलं आहे. शुक्रवारी नानीनं जर्सी पाहिल्यानंतर ट्वीटरवर आपला सिनेमासंदर्भातला रिव्ह्यू दिला आणि लिहिलं,''जर्सी पाहिला आणि आमच्या गौतम तिन्ननुरीनं यावेळी पुन्हा सिक्सर मारला आहे. शाहिद कपूर,मृणाल ठाकूर,पंकज कपूर सर आणि माझा मित्र रोनित काय परफॉर्मन्स आहेत सगळ्यांचे. हा खूपच चांगला सिनेमा आहे. खूप खूप अभिनंदन''.

आपल्या माहितीसाठी इथं सांगतो,गौतम तिन्नानुरी द्वारा दिग्दर्शित 'जर्सी' सिनेमा हा सुपरहिट तेलुगु सिनेमाचा रीमेक आहे. तेलुगु सिनेमात सुपरस्टार नानी मुख्य भूमिकेत होता. तेलुगु सिनेमा जर्सीचं दिग्दर्शन गौतन तिन्नानुरीनं केलं होतं. एका अयशस्वी क्रिकेटर अर्जुनभोवती हा 'जर्सी' सिनेमा फिरतो. जो केवळ आपल्या मुलासाठी टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करण्यासाठीच्या आपल्या जुन्या स्वप्नाला पूर्ण करण्याचा निर्णय घेतो.

हेही वाचा: अपघातानंतर मलायकाला सुरु झालाय 'तो' त्रास; सिनेमा पाहणंही अवघड झालं म्हणाली

शाहिद कपूरचा हा सिनेमा खरंतर १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण त्याच दिवशी केजीएफ चॅप्टर २ प्रदर्शित होणार असल्याची घोषणा झाली. त्यामुळे केजीएफ साठी लोकांची उत्सुकता पाहता जर्सी च्या निर्मात्यांनी सिनेमाचं प्रदर्शन काही दिवसांसाठी पुढे ढकललं. तसं पाहिलं तर याआधी देखील सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं. जर्सी गेल्यावर्षी ३१ डिसेंबरलाच सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. परंतु,कोव्हिड-१९ च्या तिसऱ्या लाटेच्या निर्बंधामुळे निर्मात्यांनी सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं होतं. आता २२ एप्रिलला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस सिनेमागृहात दाखल झाला आहे.

Web Title: Telugu Superstar Nani Speaks On Jersey

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..