Box Office Collection: शाहिदचा 'तेरी बातों में..' की रजनीकांतचा 'लाल सलाम', बॉक्स ऑफिसवर कोणाची दिसली जादू? जाणून घ्या कलेक्शन

Lal Salaam box office collection day 1: 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' आणि लाल सलाम या चित्रपटांनी ओपनिंग-डेला किती कलेक्शन केलं? जाणून घेऊयात....
Lal Salaam And Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Box Office Collection
Lal Salaam And Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Box Office Collection

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya box office collection day 1: अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेता क्रिती सेनन (Kriti Sanon) यांचा रोम-कॉम चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) हा चित्रपटगृहात काल रिलीज झाला आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आहे आणि बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं धमाकेदार ओपनिंग केली आहे. सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या लाल सलाम (Lal Salaam) या चित्रपटांसोबत या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली तरीही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' आणि लाल सलाम या चित्रपटांनी ओपनिंग-डेला किती कलेक्शन केलं? जाणून घेऊयात....

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' चं कलेक्शन

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाचा अनेकांनी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. या चित्रपटातील शाहिद आणि क्रिती केमिस्ट्रीचं अनेकांनी कौतुक केलं. अशातच आता या चित्रपटानं ओपनिंग-डेला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. शाहिद आणि क्रिती यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 6.5 कोटींची कमाई केली. या चित्रपटानं कलेक्शनच्याबाबतीत रजनीकांत यांच्या लाल सलाम या चित्रपटाला मागे टाकले आहे.

Lal Salaam And Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Box Office Collection
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya: काली अखियां नव्हे आता शाहिद अन् क्रिती घेऊन आलेय 'लाल पीली अखियां'!

'लाल सलाम'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

लाल सलाम या चित्रपटानं ओपनिंग-डेला 4.3 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रजनीकांत यांची लेक ऐश्वर्यानं केलं आहे. विष्णू विशालनं देखील या चित्रपटात काम केलं आहे.

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. या चित्रपटात शाहिद कपूर एका वैज्ञानिकाची भूमिका साकारतो तर क्रिती ही सेनन ही सिफ्रा नावाच्या रोबोटची भूमिका साकारती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com