Thandel Teaser: पाकिस्तानात घुमला 'भारत माता की जयचा नारा!' नागा चैतन्य - साई पल्लवीच्या 'थंडेल'चा टीझर बघाच

नागा चैतन्य - साई पल्लवीच्या 'थंडेल'चा टीझर पाहाच
thandel movie teaser out now naga chaitanya sai pallavi look out
thandel movie teaser out now naga chaitanya sai pallavi look outSAKAL

Thandel Teaser Naga Chaitanya Sai Pallavi News: नागा चैतन्य त्याच्या आगामी 'थंडेल' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता त्याच्या निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे.

नागाच्या थंडेल सिनेमाचा टीझरही रिलीज झाला आहे. टीझरमध्ये अभिनेत्याची ओळख मच्छिमार म्हणून करण्यात आली आहे. हा लूक चाहत्यांना चांगलाच आकर्षित करतोय. विशेष म्हणजे या सिनेमात नागा चैतन्यसोबत अभिनेत्री साई पल्लवी झळकत आहे.

thandel movie teaser out now naga chaitanya sai pallavi look out
Indian Police Force Trailer: रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलीस फोर्स'चा जबरदस्त ट्रेलर, मराठी कलाकारांची मांदियाळी

थंडेलचा धमाकेदार टीझर रिलीज

टीझर पाहताना हे स्पष्ट होते की नागा चैतन्य समुद्रमार्गे भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचतो. ज्यासाठी त्याला पाकिस्तान सरकारने ताब्यात घेतले आहे.

नागा चैतन्य कराची तुरुंगात आहे, पण त्याचा आत्मविश्वास अजिबात कमी होत नाही. जेव्हा पाकिस्तानी अधिकारी भारताबद्दल चुकीचे बोलतात तेव्हा नागा चैतन्य त्यांना ठणकावून सांगतो की, "पाकिस्तान हा भारतापासून वेगळा झालेला छोटा तुकडा आहे. भारत माता की जय!"

हा संवाद ऐकताच अंगावर रोमांच उभे राहतात.

साई पल्लवीची दमदार भूमिका

थंडेलच्या टीझरमध्ये साई पल्लवी शेवटी दाखवली आहे. ती नागाच्या परतीची आतुरतेने वाट पाहत आहे. साईला टीझरमध्ये पाहताच सर्वांना आनंद झालाय.

निर्मात्यांनी जबरदस्त व्हिज्युअल, जबरदस्त पार्श्वभूमी आणि ठोस संवादांसह चित्रपटाची थीम आकर्षक पद्धतीने सादर केली.

चंदू मोंदेटी दिग्दर्शित हा चित्रपट नागा चैतन्यच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक चित्रपट ठरणार आहे, असे दिसते. बनी वास या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

'थंडेल'ची ग्रेट टीम

'थंडेल' हा चैतन्य आणि साई पल्लवी यांच्या 2021 च्या यशस्वी 'लव्ह स्टोरी' सिनेमानंतरचे दुसरा सिनेमा आहे.

या चित्रपटाची निर्मिती गीता आर्ट्स अंतर्गत बानी वासने केली असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते देवी श्री प्रसाद यांनी संगीत दिले आहे.

शामदत यांनी सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली आहे, तर नवीन नूली चित्रपटाच्या एडिटिंगची जबाबदारी सांभाळत आहेत. 'थंडेल'च्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निर्मात्यांनी ठरवलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com