Ajay Devgn: 'थॅंक गॉड' मधील अजयच्या चित्रगुप्त व्यक्तिरेखेचं नाव बदललं, रिलीज आधी 3 मोठे बदल... Thank God | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thank god: 3 changes in Movie before 3 days of release, ajay devgan  Chitragupt character name change

Ajay Devgn: 'थॅंक गॉड' मधील अजयच्या चित्रगुप्त व्यक्तिरेखेचं नाव बदललं, रिलीज आधी 3 मोठे बदल...

Ajay Devgn: अजय देवगण,सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुलप्रीत सिंग अभिनित 'थॅंक गॉड' सिनेमाविषयी गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला नाही तोवर वादाचं चक्र सिनेमाभोवती घोंघावू लागलेलं आपण पाहिलं. सिनेमातील चित्रगुप्त व्यक्तिरेखेला ज्या पद्धतीनं दाखवलं आहे त्यावर सगळ्यांनीच आक्षेप घेतला. तसंच, सिनेमानं धार्मिक भावना दुखावल्याचं मत देखील अनेकांनी व्यक्त केलं. सिनेमातील कलाकार आणि मेकर्स विरोधात केसही दाखल करण्यापर्यंत प्रकरण पोहोचलं. वाद वाढतोय हे पाहिल्यानंतर आता मेकर्सनी सिनेमात काही बदल केले आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या सर्टिफिकेटसाठी सिनेमा पाठवण्यापूर्वीच तीन बदल सिनेमात करण्यात आले होते.(Thank god: 3 changes in Movie before 3 days of release, ajay devgan Chitragupt character name change)

हेही वाचा: Money Laundring Case: दिवाळीचा मुहूर्त जॅकलिनसाठी ठरेल का लकी? अभिनेत्रीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

इंद्र कुमार दिग्दर्शित थॅंक गॉड सिनेमाला शुक्रवारी म्हणजे २१ ऑक्टोबर रोजी सेन्सॉरनं U/A सर्टिफिकेट दिलं आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवलं गेलं आहे की,सिद्धार्थ मल्होत्राचा मृत्यू होतो आणि तो थेट चित्रगुप्ताजवळ पोहोचतो. तिथे त्याच्या सगळ्या पापांचा हिशोब केला जातो. ट्रेलर मध्ये इमोशन्सची चांगलीच रोलर-कोस्टर राइड पहायला मिळाली. रकुल प्रीत सिंगने सिद्धार्थच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सिनेमात नोरा फतेहीचं आयटम सॉंग देखील आहे.

अजय देवगणच्या सिनेमातील बदलांविषयी बोलायचं तर यात तीन बदल केले गेले आहेत. एका फ्रेममध्ये दिसणारा मद्य कंपनीच्या ब्रान्डचा लोगो थोडा पुसट करण्यात आला आहे. मंदीराच्या सीनला दुसऱ्या अॅंगलने दाखवण्यात आलं आहे. म्हणजे थोडे बदल तिथंही एडिटिंगच्या माध्यमातून केले आहेत. तर तिसरा बदल सिनेमाच्या सुरुवातीला लिहिलेल्या डिस्क्लेमर कॉन्टेंटमध्ये केला आहे. डिस्क्लेमर स्क्रीनवर दिसण्याचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे म्हणजे प्रेक्षकांना याला पूर्ण नीट वाचता येईल.

हेही वाचा: Ramsetu Song Launch: 'जय श्री राम' गाणं सुरू होणार इतक्यात अक्षयनं...', Viral Video ने अभिनेता चर्चेत

थॅंक गॉड सिनेमाचा जेव्हा टीझर रिलीज झाला होता,तेव्हा काही लोकांनी सिनेमात चित्रगुप्त हे नाव वापरण्यावर देखील आक्षेप घेतला होता. हिंदू पौराणिक कथेनुसार चित्रगुप्तांना देवाचा दर्जा दिलेला आहे,जसं सिनेमातही दाखवलं गेलं आहे. सिनेमाच्या रिलीजवर बंदी आणण्यासाठी तक्रारदारांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजेही ठोठावले होते. या प्रकरणात आता २१ नोव्हेंबरला सुनावणी होईल. पण आता सिनेमात बदल करुन मेकर्सनी एक सुरक्षित सुवर्णमध्य काढल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे.

थॅंक गॉड दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे २५ ऑक्टोबर,२०२२ रोजी रिलीज होणार आहे. या दिवशीच अक्षयचा रामसेतू रिली होत आहे. हे दोन्ही सिनेमे बॉक्सऑफिसवर आमने-सामने येतायत. माहिती कळत आहे की, दोन्ही सिनेमांचे बुकिंग २० ऑक्टोबर म्हणजे गुरुवारपासूनच सुरू झाले आहे आणि दोन्ही सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण अक्षय कुमारचा 'रामसेतू' अॅडव्हान्स बुकिंगमध्ये अजयच्या 'थॅंक गॉड'पेक्षा कणभर सरस ठरत असल्याचं म्हटलं जात आहे.