Ramsetu Song Launch: 'जय श्री राम' गाणं सुरू होणार इतक्यात अक्षयनं...', Viral Video ने अभिनेता चर्चेत Akshay Kumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar Remove his shoes before ramsetu song jai shree ram launch video .goes vrial.

Ramsetu Song Launch: 'जय श्री राम' गाणं सुरू होणार इतक्यात अक्षयनं...', Viral Video ने अभिनेता चर्चेत

Akshay Kumar: अक्षय कुमारचा 'रामसेतू' सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणाऱ्या रामसेतूचा ट्रेलर ११ ऑक्टोबरला शेअर केला गेला आणि याच्या बॅकग्राऊंडला वाजणारं 'जय श्री राम' गाणं लोकांनी खूप पसंत केलं. गुरुवारी मेकर्सनी हे गाणं रिलीज केलं, जे लोकांना खूप आवडताना दिसत आहे. आतापर्यंत १० मिलियन लोकांनी यूट्युबवर जय श्री राम गाण्याचा व्हिडीओ पाहिल्याचं कळत आहे.(Akshay Kumar Remove his shoes before ramsetu song jai shree ram launch video .goes vrial.)

हेही वाचा: Rashmika Mandana: धनत्रयोदशी निमित्तानं चाहते देणार गोल्डर्न गर्ल रश्मिकाला आश्चर्याचा सुखद धक्का!

रामसेतु चं हे गाणं भरपूर प्रसिद्ध झालं आहे, पण आता जय श्री राम गाण्याच्या लॉंचिंग सोहळ्यातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे आणि या व्हिडीओत अक्षय अशी एक गोष्ट करताना दिसला आहे ज्यानं सगळ्यांचं मन जिंकून घेतलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे,आणि अक्षयची जोरदार चर्चा त्यामुळे रंगली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये रामसेतू अभिनेता अक्षय कुमार गाण्याच्या लॉन्च सोहळ्यात हजर राहिलेला दिसत आहे. गाणं लॉन्च होण्याच्या बरोबर काही क्षण आधी अक्षय लोकांसोबत बोलताना दिसत आहे की आपण हे गाणं सगळे मिळून गाऊया. आणि असं करताना तो आपले पायातील शूज बाजूला काढून ठेवतो. आणि यानंतर गाणं लॉन्च होतं आणि अक्षय स्टेजवर लोकांसोबत गाणं गाताना देखील दिसत आहे.

हेही वाचा: Prajakta Mali: 'जेव्हा तुमच्या क्रशसोबत तुमचं लग्न होतं..', प्राजक्ताच्या पोस्टनं वेधलं लक्ष

अक्षयच्या या वागणुकीनं लोकांचे मन मात्र जिंकले आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'म्हणूनच मला अक्षय खूप आवडतो. एवढा मोठा अभिनेता असूनही त्यानं हिंदू परंपरेचा मान राखला. एवढ्या चांगल्या मनाच्या माणसाचा कोण राग करेल. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अक्षयची प्रशंसा करतानाचा या व्हिडीओला शेअर देखील केले आहे'.

हेही वाचा: KBC14: केबीसीच्या मंचावर अमिताभनी का मागितली विनोद खन्ना यांची माफी? म्हणाले, '44 वर्षांपूर्वी...'

रामसेतू या वर्षात रिलीज होणारा अक्षयचा चौथा सिनेमा आहे. याआधी बच्चन पांडे,सम्राट पृथ्वीराज,रक्षाबंधन थिएटर्समध्ये रिलीज झाले होते. आणि तिन्ही बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरले. आता अक्षय कुमारचा रामसेतु हा प्रभु रामचंद्राच्या कथेवर आधारित पौराणिक सिनेमा आहे,जो कथेतील राम-सेतु पुलावर भाष्य करतो. दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांनी उचलून धरला तर तो या वर्षातला अक्षयचा पहिला हिट सिनेमा ठरू शकतो. रामसेतूला तगडं आव्हान असेल ते अजय देवगण-सिद्धार्थ मल्होत्राच्या 'थॅंक गॉड' सिनेमाचं.