Boman and Billie New Baby Elephant : ऑस्करनं वाढवला बोमन अन् बेलीचा उत्साह! कुटुंबात आता नव्या रघुची एन्ट्री

The Elephants Whisperers fame Bomman and Bellie adopts another 4 months old orphaned baby elephant watch video
The Elephants Whisperers fame Bomman and Bellie adopts another 4 months old orphaned baby elephant watch video

भारताला ऑस्कर मिळवून देणाऱ्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून बोमन आणि बेली ही जोडी आता जवळपास सगळ्यांना माहिती झाली आहे. त्यांच्यावर बनवण्यात आलेल्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचाऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. नेटफ्लिक्सच्या या डॉक्युमेंटरीमध्ये कळपापासून विभक्त झालेला हत्ती आणि त्याला दत्तक घेऊन त्याची काळजी घेणारी व्यक्ती यांच्यातील खास नातं दाखवण्यात आलं आहे.

दरम्यान जागतीक व्यासपीठावर सर्व भारतीयांची मान आभिमानाने उंचवणाऱ्या या डॉक्युमेंट्रीचा विषय असलेले हे बोमन आणि बेली यांनी आणखी एक हत्ती दत्तक घेतला आहे. आयएएस सुप्रीया साहू यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.

त्यांनी ट्वीट केलंय की जीवनाचे चक्र सुरू आहे #TheElephantsWhisperers बोम्मन आणि बेली आता धर्मपुरी येथील दुसर्‍या अनाथ हत्तीचे पालक बनले आहेत, आता मुदुमलाई येथे टीम #TNForest ने 4 महिन्यांच्या बछड्याला कळपासह पुन्हा एकत्र करण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण तो आता सुरक्षित हातात आहे, याचा आम्हाला आनंद आहे. असं ट्वीट त्यांनी केलं आहे. यासोबतच त्यांनी एक व्हिडीओ क्लिप देखील शेअर केली आहे.

हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

The Elephants Whisperers fame Bomman and Bellie adopts another 4 months old orphaned baby elephant watch video
Pune Crime News : आता तुमचा मर्डरच करतो म्हणत तरुणावर कोयत्याने वार; मनगटापासून पंजाच तुटला
The Elephants Whisperers fame Bomman and Bellie adopts another 4 months old orphaned baby elephant watch video
Oscars 2023: ऑस्कर जिंकणाऱ्या The Elephant Whispers ची गोष्ट आहे तरी काय? कुठे पहाल ही शॉर्ट फिल्म?

ऑस्करने मिळालेली ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही डॉक्युमेंट्री तामिळनाडूमधील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील एका कुटुंबाबद्दलची माहिती देणारी आहे. 41 मिनिटांची ही डॉक्युमेंट्रीहत्ती आणि त्याला सांभाळणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर भाष्य करतो. या डॉक्युमेंट्रीमध्ये हे जोडपं दोन हत्ती दत्तक घेतात आणि त्यांचे संगोपन करतात. कार्तिकी गोन्साल्विस यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. एकूण 41 मिनिटांची ही डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com