The Family Man 2: निर्मात्यांची मोठी घोषणा, नेटफ्लिक्सबरोबर सीरिज | The family man 2 director raj and DK create a new series | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

the family man makers
The Family Man 2: निर्मात्यांची मोठी घोषणा, नेटफ्लिक्सबरोबर सीरिज

The Family Man 2: निर्मात्यांची मोठी घोषणा, नेटफ्लिक्सबरोबर सीरिज

Hindi Web Serise: टीव्ही मनोरंजन (Tv entertainment) विश्वामध्ये वेब सीरिज (Web Serise) सर्वात आवडता प्रकार गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरु झाला आहे. भारतीय वेब सीरिजच्या दुनियेत ज्या मालिकेनं सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती मिळवली त्या द फॅमिली मॅन (The Family Man 2) या मालिकेच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. मनोज वाजपेयी, समंथा, शरद केळकर यांच्या भूमिकांचं कौतूक झालं होतं. या मालिकेच्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे ते नेटफ्लिक्सच्या सहकार्यानं आणखी एका मालिकेची निर्मिती करणार आहे. येत्या काही महिन्यात त्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. द फॅमिली मॅनला (The family man 2) केवळ भारतच नाहीतर जगभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले होते.

हेही वाचा: Bigg Boss 15: आंटी म्हटलीच कशी? बिग बॉसच्या घरात धिंगाणा

या नव्या सीरिजचे लेखन सुमन कुमार, सुमित अरोडा यांच्या सहित राज अँड डीके करत आहे. सुमन यांनीच फॅमिली मॅनचे लेखन केले होते. राज निदीमोरु आणि कृष्णा डीके हे त्यांच्या वेगळ्या शैलीच्या दिग्दर्शनामुळे ओळखले जातात. त्यांच्या स्त्री, गो गोवा गॉन, शोर इन द सिटी आणि 99 या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. याशिवाय राज अँड डीके यांना एक सीरिज बनवायची असून त्यामध्ये शाहिद कपूर दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: Doobey Viral: डूबे'ची क्रेझ, दीपिका सिद्धांतचा 'गहराइया'

Web Title: The Family Man 2 Director Raj And Dk Create A New Series With Netflix

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top