
'द घोस्ट'मधील नागार्जुनच्या भूमिकेची चर्चा, केवळ ४९ सेकंदात ८ जणांची हत्या
The Ghost - Killing Machine Trailer : ब्रह्मास्त्र फेम अभिनेता नागार्जुनचा नवीन चित्रपट 'द घोस्ट' चा टीझर व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. तलवारबाजी करणारा नागार्जुन (Nagarjuna) चित्रपटाच्या या पहिल्या झलकमध्ये खूपच भयावह अंदाजात दिसत आहे. निर्मात्याने चित्रपटाचा टीझर व्हिडिओ प्रदर्शित करत पात्राविषयी सांगितले आहे. निर्मात्याने लिहिले, तुम्ही त्याला मारु शकत नाही, तुम्ही त्याच्यापासून पळू शकत नाही, तुम्ही त्याच्याशी तडजोड करु शकत नाही, तुम्ही फक्त दयेची भीक मागू शकता. (The Ghost Killing Machine Teaser Out, Akkineni Nagarjuna First Look)
हेही वाचा: नागार्जुन यांचा समंथा-नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाविषयी मोठा खुलासा
द घोस्ट - किलिंग मशिनच्या टिझरमध्ये काय आहे?
नागार्जुनच्या आगामी चित्रपट 'द घोस्ट'च्या टिझरमध्ये तुम्हाला रक्ताळलेला चंद्र दिसतो. त्याच्यासमोर एक व्यक्ती हातात तलवार घेऊन उभा आहे. त्या विरुद्ध अनेक जण उभे असून ती अचानक त्याच्याकडे धावू लागतात. त्यानंतर नागार्जुन तलवारीने त्या सर्वांना संपवतो. केवळ ४९ सेकंदात नागार्जुनला ८ जणांचा शिरच्छेद करताना दाखवले आहे. टिझरमध्ये रक्तपात दाखवला गेला आहे.
नागार्जुनची पहिली झलक आहे भयावह
सूटा-बुटात नागार्जुन कोणत्याही हाॅलीवूड (Hollywood) चित्रपटातील खलनायकासारखा दिसत आहे. तो आपल्या तलवारीने शत्रूंचा शिरच्छेद करण्यास सेकंदाचाही उशीर करत नाही. चित्रपटाचा टिझर पाहून तुम्ही म्हणून शकता की याविषयी निर्मात्यांचे म्हणणे चुकीचे नव्हते. केवळ ४९ सेकंदात चित्रपटाच्या या टिझर व्हिडिओत नागार्जुनच्या लुकचीही झलक पाहायला मिळते. यात त्याच्या चेहऱ्यावर रक्त स्पष्टपणे दिसू शकते.
हेही वाचा: ...जबाबदारी नाहीच, कुणाल कामराची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
ब्रह्मास्त्रात महत्त्वाच्या भूमिकेत
दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनने ब्रह्मास्त्रमध्ये खूपच खास भूमिका केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही त्यात त्यांची झलक दिसत होती. रणबीर कपूर, आलिया भट, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी राॅय या सारख्या सिनेतारकांच्या भूमिकेमुळे हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
Web Title: The Ghost Killing Machine Teaser Out Akkineni Nagarjuna First Look
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..