The Ghost: नागार्जुनच्या 'घोस्ट'चं वादळ घोंघावणार!

बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सुरु असताना दुसरीकडे टॉलीवूडचे वेगवेगळे चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहे.
The Ghost
The Ghostesakal

The Ghost Movie: बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सुरु असताना दुसरीकडे टॉलीवूडचे वेगवेगळे चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहे. गेल्या वर्षीपासून टॉलीवूडच्या चित्रपटांनी बॉलीवूड प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुष्पापासून सुरु झालेली ही यादी कमल हासन यांच्या विक्रमपर्यत येवून थांबली आहे. आता साऊथचा सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. प्रवीण सत्तारू दिग्दर्शित 'द घोस्ट' या आगामी चित्रपटात नागार्जुन इंटरपोल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

नागार्जुनचा हा चित्रपट ५ ऑक्टोबर रोजी रिलीज होणार असून द घोस्ट सुरुवातीपासूनच प्रचंड आपल्या नावाची छाप पाडत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे निर्माते चित्रपट हिंदी आणि तामिळमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. “निर्माते आधीपासूनच तामिळ आणि हिंदीमध्ये एकाच वेळी द घोस्ट रिलीज करण्याच्या एका रोमांचक कल्पनेवर चर्चा करत आहेत. तेलगू भाषेत कदाचित एक आठवड्यानंतर येईल . तरीही चर्चा आधीच सुरू झाली आहे.तर निर्माते कन्नड आणि मल्याळम भाषेत देखील एकत्र रिलीज करण्याची योजना आखत आहेत. लवकरच अधिकृत घोषणा ऐकू येईल.”

या चित्रपटात सोनल चौहानसोबत नागार्जुनची जोडी आहे. हा अॅक्शन थ्रिलर आहे असे म्हटले जाते, द घोस्टमध्ये गुल पनाग आणि अनिखा सुरेंद्रन देखील प्रमुख भूमिकेत आहेत. " द घोस्ट "५ ऑक्टोबर २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

The Ghost
Nikki Tamboli: निक्कीला पाहावं, शांत व्हावं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com