'द हिंदू बॉय' मध्ये नेमकं आहे काय? 'काश्मीर फाईल्स' नंतर चर्चेत|The Hindu Boy After The Kashmir Files | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Hindu Boy After The Kashmir Files Sharad Malhotra

'द हिंदू बॉय' मध्ये नेमकं आहे काय? 'काश्मीर फाईल्स' नंतर चर्चेत

Sharad Malhotra The Hindu Boy film on Kashmiri Pandits: विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली (The Kashmir Files) होती. अवघ्या वीस ते तीस कोटींमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं दीडशे कोटींची कमाई केली आहे. काश्मीर आणि काश्मीर पंडितांचा ज्वलंत विषय, (Bollywood News) 1990 च्या दरम्यान काश्मीरच्या खोऱ्यात त्यांच्यावर झालेले अन्याय, अत्याचार यावर प्रभावीपणे भाष्य़ अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्सनं केले होते. या चित्रपटाला मोठ्या वादाचा सामनाही करावा लागला. त्यावरुन (Bollywood Movies) राजकीय, सामाजिक वादही रंगला. त्यानंतर अग्निहोत्री यांच्या काश्मीर फाईल्सची आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दखलही घेण्यात आली होती. आता त्यांनी द दिल्ली फाईल्स या सिनेमाची घोषणा केली आहे. या परिस्थितीत द हिंदू बॉय नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

द हिंदू बॉय मध्ये प्रसिद्ध अभिनेता शरद मल्होत्रानं प्रमुख भूमिका साकारली आहे. काश्मीरी पंडितांच्या बाबत जे काही झालं त्यावर वेगळ्या दृष्टीकोनातून भाष्य करणारी ही फिल्म असल्याचे सांगण्यात येत आहे. तीस वर्षानंतर पुन्हा काश्मीरच्या खोऱ्यात आलेल्या युवकाला कोणकोणत्या गोष्टी नव्यानं जाणवतात हा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे. त्याच्यासोबत जे काही घडते त्याविषयी कुणाला कसलीच कल्पना नव्हती. काश्मीरच्या खोऱ्यात काय चालते हे लोकांना वाचून आणि ऐकुन माहिती होते. मात्र जेव्हा अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाला तेव्हा मात्र त्यावरुन वेगळ्याच प्रकारचे भयाण वास्तव समोर आले होते. आत द हिंदू बॉयमधून पुन्हा एकदा भारताचे नंदनवन असणाऱ्या काश्मीरच्या वेगवेगळ्या पैलुंना समोर आणण्यात आले आहे. हा एक लघुपट असून पुनीत बालन यांनी त्याची निर्मिती केली आहे.

काश्मीर फाईल्सच्या एकदम विरुद्ध असणारी फिल्म म्हणून सध्या द हिंदू बॉयच्या नावाची चर्चा आहे. काश्मीरच्या खोऱ्यात फक्त नरसंहारच झाला नाही तर... आणखी अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या बाकीच्या लोकांना माहिती नाही. काश्मीरचं खोरं हे अजुनही तितकचं शांत आहे जेवढं ते यापूर्वी होतं. याठिकाणची लोकं अतिशय मनमिळावू आहेत. त्यांच्यात आणि प्रशासनामध्ये सुसंवाद आहे. अशाप्रकारे वेगवेगळे मुद्दे द हिंदू बॉयच्या निमित्तानं समोर आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाहनवाज बाकल यांनी केले आहे. त्यांनीच कथालेखनही केले आहे. मुख्य भूमिका शरद मल्होत्रा यानं साकारली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटा़चं कौतुक होताना दिसत आहे.

प्रेक्षक आणि समीक्षक यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादानुसार, द हिंदू बॉयमध्ये शरदनं प्रभावी भूमिका साकारली आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्सला मिळालेल्या प्रतिसादानंतर त्याच्या पुढील भागाची चर्चा होण्यास सुरुवात झाली आहे. अग्निहोत्री यांनी द दिल्ली फाईल्स नावाच्या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. द हिंदू बॉय विषयी सांगायचे झाल्यास, त्यामध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या शरदनं 2004 मध्ये अभिनयाच्या विश्वात पाऊल टाकलं. त्याला 'बनूं मैं तेरी दुल्हन' मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळाली होती.

हेही वाचा: RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

चित्रपटाचे निर्माते पुनीत बालन यांनी म्हटले आहे की, या चित्रपटातून काश्मीरी पंडितांची वेदना द हिंदू बॉय मधून मांडण्यात आली आहे. त्यांनी जे भोगलं आहे त्याविषयी भाष्य चित्रपटातून करण्यात आले आहे. मला नेहमीच त्यांची मदत करण्याची इच्छा होती. काश्मीरच्या खोऱ्यातील लोकांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं हे इतरांना माहिती व्हावं यासाठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

Web Title: The Hindu Boy After The Kashmir Files Sharad Malhotra Lead Role Kashmiri Pandits Reality

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top