The Indrani Mukerjea Story On Netflix : शीना बोरा हत्याकांडावर आधारित डॉक्युमेंट्री सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला, रिलीज डेट जाहीर!

देशाला हादरवून टाकणाऱ्या घटनेपैकी एक असणाऱ्या शीना बोरा हत्याकांडानं त्यावेळी अनेकांना कोड्यात पाडलं होतं.
 The Indrani Mukerjea Story On OTT Netflix
The Indrani Mukerjea Story On OTT Netflixesakal

The Indrani Mukerjea Story On OTT Netflix : देशाला हादरवून टाकणाऱ्या घटनेपैकी एक असणाऱ्या शीना बोरा हत्याकांडानं त्यावेळी अनेकांना कोड्यात पाडलं होतं. त्या घटनेचा तपास करणाऱ्या अनेक तपास यंत्रणांनाही देखील त्या केसेची तपासणी करताना अनेक वेगळे प्रश्न पडले होते. शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्रानी मुखर्जीवर आधारित एका माहितीपटाच्या सीरिजची घोषणा करण्यात आली आहे.

द इंद्रानी मुखर्जी स्टोरी - बरीड ट्रुथ (The Indrani Mukerjea Story: Buried Truth) असे त्या मालिकेचे नाव असून ती नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यावेळी नेटफ्लिक्सकडून त्या डॉक्युसीरिजची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्याच्या २३ तारखेला ही मालिका प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इंद्रानी मुखर्जी ही शीना बोरा हत्याकांडातील काही गोष्टींवर सडेतोडपणे भाष्य करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या सोशल मीडियावर जे पोस्टर व्हायरल झाले आहे त्यात इंद्रानीचा चेहरा दिसतो आहे. २०१२ मध्ये घडलेल्या त्या हत्याकांडानं मोठी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर २०१५ मध्ये इंद्राणी ही चर्चेत आली होती. त्यानंतर पुढे बरीच वर्षे तिला तुरुंगात घालवावी लागली. या सगळ्या घटनेवर तिनं पुस्तकही लिहिलं आहे.

शीना बोरा केसमधील प्रमुख आरोपी म्हणून इंद्रानीचं नाव समोर आलं होतं. आता नेटफ्लिक्सनं त्यांच्या इंस्टावरुन आगामी डॉक्युसीरिजची घोषणा केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, साऱ्या देशाला धक्का देणारी ती घटना होती. एका कुटूंबाचे डार्क सिक्रेट या मालिकेच्या माध्यमातून समोर येणार आहे. ही मालिका २३ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

ही डॉक्युसीरिज इंद्राणी मुखर्जीच्या २०२३ मध्ये आलेल्या अनब्रोकन - द अनटोल्ड स्टोरी नावाच्या पुस्तकावर आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे. इंद्राणीनं या घटनेत सहा वर्षांचा तुरुंगवास भोगला असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.

इंद्राणीनं काही महिन्यांपूर्वी एक वेगळाच दावा केला होता.त्यात तिनं म्हटलं होतं की, ज्या मुलीच्या हत्येसाठी मला तुरुंगात डांबण्यात आले ती अजुनही जिवंत आहे.त्यामुळे वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. तिनं याबाबत तिच्या आत्मकथनात्मक पुस्तकामध्ये खुलासाही केला असल्याचे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com