The Kapil Sharma Show : 'पुरुषांनी कधीही घरात...' मंदाकिनीला कपिलचा तो प्रश्न, वर्षा उसगावकर, संगीता बिजलानीही लाजल्या!

९० च्या दशकांतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, संगीता बिजलानी आणि मंदाकिनी या पाहुण्या कलाकार म्हणून कपिलच्या शोमध्ये आल्या होत्या.
The Kapil Sharma Show
The Kapil Sharma Showesakal
Updated on

The Kapil Sharma Show : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकेनं प्रेक्षकांचे गेल्या दशकभरापासून मनोरंजन केले आहे त्यामध्ये द कपिल शर्माचे नाव घेता येईल. कपिलच्या शो मध्ये अनेक सेलिब्रेटी त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येत असतात. आता या शोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर, मंदाकिनी आणि संगीत बिजलानी सहभागी झाल्या होत्या.

९० च्या दशकांतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, संगीता बिजलानी आणि मंदाकिनी या पाहुण्या कलाकार म्हणून कपिलच्या शोमध्ये आल्या होत्या. यावेळी कपिलनं त्यांना बोलतं केलं. मात्र यासगळ्यात चर्चेत आल्या त्या राम तेरी गंगा मैली फेम मंदाकिनी. मंदाकिनीला कपिलनं तो प्रश्न विचारला आणि त्यानंतर ती मुलाखत भलतीच रंगल्याचे दिसून आले. सध्या सोशल मीडियावर त्याचा प्रोमो व्हायरल झाला आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्रोमोमध्ये कपिलनं मंदाकिनीला तिचा सर्वाधिक चर्चेतील चित्रपट राम तेरी गंगा मैलीवरुन प्रश्न विचारला. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कपूर यांनी केले होते. त्यामध्ये राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूर प्रमुख भूमिकेत होती. राम तेरी गंगा मैलीवरुन कपिल शर्मानं मंदाकिनी यांची टिंगल केल्याचे दिसून आले. राम तेरी गंगामध्ये मंदाकिनी यांनी त्यावेळी भलतेच बोल्ड सीन दिले होते. त्यामुळे तो चित्रपट प्रचंड वादात सापडला होता.

The Kapil Sharma Show
The Kerala Story: 'केरळ स्टोरी पाहायला थिएटरमध्ये कुणीच नव्हतं....', तामिळनाडू सरकारचं सर्वोच्च न्यायालयाला उत्तर

यावेळी कपिलनं त्या गोष्टीचा उल्लेख करताना म्हटलं की, मंदाकिनीला सगळेजण ओळखतात. त्यांची राम तेरी गंगा मैली नावाची फिल्म खूप चर्चेत आली होती. त्यानंतर त्यांची लोकप्रियता देखील खूप वाढली होती. लग्न झालेली माणसं मंदाकिनीचं पोस्टर घरात लावायला घाबरायची. काहींनी पत्नीची भीती वाटायची. अशातच पत्नी म्हणायची, मंदाकिनी नावाची अभिनेत्री आली आहे तुम्ही तिला पाहिलं का, त्यावेळी अनेकजण वेगळचं उत्तर द्यायचे.

The Kapil Sharma Show
The Kerala Story Box Office: चक्क RRR चा रेकॉर्ड मोडला, सिनेमाने गाठला इतक्या कोटींचा आकडा...

कपिलनं तो प्रश्न विचारल्यानंतर मंदाकिनी यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. सोशल मीडियावर त्या आगामी शो चा प्रोमो व्हायरल झाला असून त्याला मिळालेला प्रतिसाद मोठा असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com