

The Kashmir Files: सोशल मीडियावर द काश्मीऱ फाईल्सनं धुमाकुळ घातला (Social media News) आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटानं चाहत्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी काश्मीर फाईल्सनं जी कमाई केली आहे ती काश्मीर पंडितांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात यावी. त्यानंतर अग्निहोत्री यांनी केजरीवाल यांना जशास तसे उत्तर दिले होते. दिल्लीतील बॉम्ब स्फोटावर आपण एक नवीन चित्रपटाची निर्मिती करत असून त्यासाठी मग आपण साह्य करावे. अशी मागणी केजरीवाल यांच्याकडे केली होती. त्यानंतर आपचे मनिष सिसोदिया (Manish Sisodiya) यांनी आता अग्निहोत्रींच्या काश्मीर फाईल्सवर प्रतिक्रिया दिली आहे.
काही दिवसांपासून काश्मीर फाईल्सनं सोशल मीडियावर वेगळा ट्रेंड सेट केला आहे. प्रेक्षकांना काश्मीर फाईल्स पाहण्याचे आवाहन केले जात आहे. काही ठिकाणी या चित्रपटावरुन वादही निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. अशावेळी देशातील काही राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केल्याचे दिसून आले आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकारकडे देखील करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ती फेटाळण्यात आली. सध्या काश्मीर फाईल्सच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईची चर्चा आहे. या चित्रपटानं दोनशे कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्य़ांचे लक्ष वेधून घेतले आहे. सिसोदियांनी विधानसभेत सांगितलं की, ज्या काश्मीरी पंडितांची कथा लोकांना सांगण्यात आली तिचे भांडवल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ती कथा विकून त्याचे पैसे कमवण्यात आले आहे. याला काय म्हणता येईल? त्यामुळे आतापर्यत निर्माते आणि दिग्दर्शक यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून जे पैसे कमावले आहेत त्यातून काश्मीर पंडितांसाठी कल्याणकारी योजनेची निर्मिती करण्यात यावी. या शब्दांत सिसोदियांनी अग्निहोत्रींना फटकारलं आहे. काश्ंमीर फाईल्सला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.