'मंदिर तयार नाही तोच, आले भीक मागायला': कुणालला नेटकऱ्यांनी झाडलं|The Kashmir Files Director Vivek Agnihotri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vivek Agnihotri and kunal kamra

'मंदिर तयार नाही तोच, आले भीक मागायला': कुणालला नेटकऱ्यांनी झाडलं

The Kashmir Files : काश्मीर फाईल्सवर वेगवेगळ्या प्रकारे वाद सुरुच आहे. काल दिल्लीचे मुख्यमंत्री यांनी हा चित्रपट यु ट्युबवर फ्री मध्ये दाखवण्यात यावा. कारण (Entertainment News) त्या चित्रपटावरुन पैसे मिळवणारे दुसरेच. आणि भाजप या चित्रपटाचा प्रचार करत आहेत. त्यामुळे लोकांनी विचार करावा. अशा प्रकारची (Social Media news) प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिली होती. त्यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील काश्मीर फाईल्सचे पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Bollywood Movies) यांनी आपण डंके की चोट पे हा चित्रपट पाहायला गेलो. आम्हाला कुणाची भीती नाही. अशाप्रकारचं वक्तव्य केलं. त्यानंतर त्यांना जयंत पाटील यांनी हा चित्रपट मध्यातरांनंतर कमालीचा बोअर असल्याचे सांगत उत्तर दिलं होतं.

यासगळ्यात प्रसिद्ध कॉ़मेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) यानं काश्मीर फाईल्सवर केलेल्या वक्तव्यानं स्वतालाच त्रास करुन घेतला आहे. त्यानं विवेक अग्निहोत्रींवर एका व्टिटच्या माध्यमातून टीकाही केली आहे. त्याचा फटका त्याला बसला आहे. कुणाल कामरा अग्निहोत्री यांच्यावर टीका करायला गेला मात्र झालं उलटचं. त्यामुळे त्याला टीका सहन करावी लागली आहे. कुणालनं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यानं लिहिलं आहे की, देशासाठी जीव द्यायला तयार. मात्र देशाच्या लोकांना पैसे देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र काही पुढाकार नाही. त्या व्हिडिओमध्ये अग्निहोत्री बोलताना दिसत आहे. अग्निहोत्रींना एका मुलाखतीमध्ये असे विचारण्यात आले होते की, या चित्रपटाचे पैसे पीडित काश्मीर पंडितांना देणार का, त्यावर त्यांनी पहिल्यांदा चित्रपटाला कमाई तर करु द्या. असं म्हटलं होतं.

हेही वाचा: Viral Video : लग्नात नववधू 'Out Of Control' अन् मग...

कामरानं हा व्हिडिओ शेयर केला आहे. मात्र त्यावरुन त्याला ट्रोल केले आहे. कुणालच्या या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चक दे इंडियामधून जे पैसे कमावण्यात आले तर ते पैसे काय भारतीय हॉकी भारतीय संघाला द्यायचे का, मंदिर तयार झाले नाही तोच भीक मागायला सुरुवात अशी आपली गत आहे. जेव्हा खान मंडळींचे चित्रपट कोट्यवधी कमावतात तेव्हा ते तुम्हाला काय देतात. असा प्रश्न त्या युझर्सनं विचारला आहे. याउलट काही युझर्सनं कुणालच्या बाजुनं व्टिट केले आहे.

Web Title: The Kashmir Files Director Vivek Agnihotri Kunal Karma Trolled Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top