
सुनंदा पुष्कर काश्मीरी हिंदू होत्या की नव्हत्या? अग्निहोत्रींनी थरूर यांना झापलं
The Kashmir Files Movie: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स पुन्हा (Bollywood news) एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याचे कारण दिग्दर्शक अग्निहोत्री आणि कॉग्रेसचे खासदार शशी थरुर (shashi tharoor) यांच्यात सोशल मीडियावर ट्विटर वॉर रंगले आहे. त्यामध्ये विवेक अग्निहोत्री (vivek Agnihotry) यांनी थेट शशी थरुर यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख केल्यानं थरुर नाराज झाल्याचे कळते आहे. त्यांच्या एका जुन्या व्टिटचा आधार घेऊन अग्निहोत्री यांनी थरुर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यापूर्वी थरुर यांनी (bollywood movies) जगातल्या कोणत्या देशांमध्ये काश्मीर फाईल्सला बंदी घालण्यात आली आहे याविषयी ट्विट केले होते. त्यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. त्याला अग्निहोत्री आणि अनुपम खेर यांनी कडक शब्दांत उत्तर दिलं आहे.
एवढ्यावरच विवेक अग्निहोत्री थांबलेले नाहीत त्यांनी शशी थरुर यांना जशास तसे उत्तर दिले आहे. तुमची बायको ही काश्मीरी हिंदू होती का नव्हती, असा प्रश्न विवेक अग्निहोत्री यांनी विचारल्यानं शशी थरुर यांना राग अनावर झाला. अग्निहोत्री यांनी त्यांच्या पुढच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, हे खरं आहे की, आपली पत्नी देखील काश्मिरी हिंदु होती. आता सध्या सोशल मीडीयावर जो स्क्रिन शॉट व्हायरल होतो आहे तो खरा आहे की खोटा, हिंदुमध्ये एखादी व्यक्ती गेल्यानंतर तिच्या पश्चात तिच्याविषयी आदरानं बोलले जाते. तुम्हाला आता त्यांचे व्टिट डिलिट करण्याची गरज असून सुनंदा यांची माफी मागावी लागेल. असं विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे. सध्या या व्टिटची जोरदार चर्चा असून त्यावर नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा: Kashmir Files नवी Controversy; दिग्दर्शक शशी थरुर यांना 'माफी मागा' म्हणाले
केवळ विवेक अग्निहोत्रीच नाहीतर द काश्मीर फाईल्सचे मुख्य अभिनेते अनुपम खेर यांनी देखील शशी थरुर यांच्या ट्विटवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, प्रिय शशी थरुर, आपण काश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्याय अत्याचाराचा अपमान करता आहात की जो पूर्णपणे चुकीचा आहे. तुम्ही जो नरसंहार झाला त्याची थट्टा करता आहात. बाकी कुणासाठी नाहीतर आपली पत्नी सुनंदा पुष्कर यांच्याप्रती तरी थोडी सहानुभूती आपण दाखविण्याची गरज आहे. त्या काश्मीरी होत्या. कुठल्या देशात काश्मीर फाईल्सवर बंदी आहे हे सांगुन तुम्ही आनंदित होण्याची काही गरज नाही. अशा शब्दांत अनुपम खेर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही
Web Title: The Kashmir Files Director Vivek Agnihotri Shashi Tharoor Controversy Tweeter War
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..