
Kashmir Files नवी Controversy; दिग्दर्शक शशी थरुर यांना 'माफी मागा' म्हणाले
'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) सिनेमावर अद्यापही वाद रंगलेले अधनं-मधनं दिसून येत आहेत. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा(Vivek Agnihotri) हा सिनेमा जेव्हापासून प्रदर्शि झाला तेव्हापासून चर्चेत आहे. कोणी सिनेमाला प्रोपोगेंडा म्हटलं तर कोणी काल्पनिक. आता पुन्हा एकदा 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाविषयी दोन नामवंत व्यक्तिमत्त्व आमने-सामने उभे ठाकले आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि कॉंग्रेस नेते शशी थरुर यांच्यात ट्वीटर वॉर छेडलं गेलं आहे. हा सगळा वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा 'द काश्मिर फाईल्स'वर सिंगापूरमध्ये बंदी आणल्याची बातमी कळाली.
हेही वाचा: 'हिंदी सिनेमा म्हणजे वेळ वाया घालवणं कारण...' महेश बाबूची तिखट प्रतिक्रिया
कारण सांगितलं गेलं की, 'द काश्मिर फाईल्स' मध्ये मुस्लिमांची एकच बाजू दाखवण्यात आली. सिनेमात उगाचच रंगवून गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. सिंगापूरच्या न्यूज एशिया टी.व्ही वाहिनीनं दिलेली बातमी शेअर करीत शशी थरुर यांनी ट्वीट लिहिलं आहे,''भारतातील सत्ताधारी पक्षानं प्रमोट केलेल्या 'द काश्मिर फाईल्स' सिनेमांवर सिंगापूरमध्ये बंदी आणण्यात आली आहे''. या ट्वीटच्या माध्यमातून शशी थरुर यांचा निशाणा भाजपाच्या दिशेने होता हे काही यातनं लपून राहिलेलं नाही.
यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी शशी थरुर यांच्या कमेंटवर उत्तर द्यायला थोडा देखील उशीर केला नाही. त्यांनी शशी थरुर यांना त्यांच्या नेहमीच्या तिखट भाषेत प्रतिउत्तर देताना म्हटलं आहे, ''प्रिय मुर्ख देश,नेहमीच तक्रार करणारा देश,सिंगापूर जगातला सर्वात मोठा मागासलेला सेन्सर आहे. या देशानं तर 'द लास्ट टेम्पटेशन ऑफ जिसस' या सिनेमावर देखील बंदी आणली होती. इतकंच काय तर 'द लीला होटल फाईल्स' या रोमॅंटिक सिनेमावरही बंदी आणली होती. कृपया,काश्मिरमधील हिंदू नरसंहाराची मस्करी उडवणं बंद करा''.
आपल्या या ट्वीटसोबत विवेक अग्निहोत्री यांनी सिंगापूरमध्ये बंदी आणलेल्या ४८ सिनेमांची एक यादी जोडली आहे. यामधील काही सिनेमांना तर IMDB वर ८ रेटिंग मिळालं होतं. विवेक अग्निहोत्री यांनी दुसऱ्या ट्वीट मध्ये शशी थरुर यांना त्यांची दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांचा दाखला दिला आहे. काय म्हणालेत विवेक अग्निहोत्री सुनंदा पुष्कर यांच्या विषयी.
हेही वाचा: बॉलीवूड पदार्पणावर शहनाझनं तोडली चुप्पी, उत्तरानं वाढवला गुंता अन् उत्सुकता
विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं आहे-''हे खरं आहे का की सुनंदा पु्ष्कर या काश्मिरी हिंदू होत्या? मी जोडलेल्या स्क्रीन शॉट मध्ये जे दिसतंय ते खरंय? जर खरं आहे,तर हिंदी पद्धतींनुसार,कोणत्याही मृत व्यक्तीला सम्मान देण्यासाठी तुम्हाला तुमच्या ट्वीटला डिलीट केलं पाहिजे,माफी मागितली पाहिजे''. विवेक अग्निहोत्री ज्या स्क्रीन शॉटविषयी बोलत आहेत ते सुनंदा पुष्कर यांचे जुनं ट्वीट आहे. ज्यामध्ये सुनंदा पुष्कर यांनी त्या काश्मिरी असल्याचं विधान केलं होतं. त्यांनी १९९०-९१ मध्ये काश्मिरमध्ये झालेल्या हिंसेवर आपण आपल्या पतीमुळं हवं तसं मत व्यक्त करु शकलो नव्हतो. असं त्यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा: सुनिल शेट्टी 'गुटखा किंग'! ट्वीटरवर रंगली चर्चा,काय आहे प्रकरण?
विवेक अग्निहोत्री यांनी हा स्क्रीनशॉट आपल्या ट्वीटला जोडून खूप मोठी गोष्ट बोलली आहे. त्यामळे आता यावर शशी थरुर काय प्रतिक्रिया देत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाविषयी बोलायचं झालं तर या सिनेमानं बॉक्सऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. हा सिनेमा ब्लॉकबस्टर यादीत सामिल झाला आहे. काश्मिरी पंडितांवरील अत्याचार,त्यांचं दुःख,संघर्ष याचं चित्रण 'द काश्मिर फाईल्स' सिनेमातनं करण्यात आलं होतं.
Web Title: Vivek Agnihotri Shashi Tharoor Spar Over Ban On The Kashmir Files In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..