
'काश्मीरची पूर्ण गोष्ट सांगितल्याशिवाय शांत बसणारच नाही', अग्निहोत्री आक्रमक
We will not rest until we tell the entire story of Kashmir says Vivek Agnihotri on The Kashmir Files - द काश्मीर फाईल्स हा त्याच्या वादग्रस्त विषयामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. 90 च्या दशकांत काश्मीरी पंडितांवर झालेल्या (kashmir Files) अन्याय अत्याचारामुळे त्यांना ज्या संघर्षाला सामोरं जावं लागलं होतं त्यामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा (director vivek Agnihotri) त्यांनी केलेल्या विधानामुळे काश्मीर फाईल्सची चर्चा होत आहे. यापूर्वी त्यांनी येत्या काळात आपण दिल्ली फाईल्स चित्रपटाची निर्मिती (Bollywood news) करणार असल्याचे सांगितले होते. केवळ भारतातच नाहीतर जगभरातील वेगवेगळ्या देशांतून काश्मीर फाईल्सवरुन प्रतिक्रिया आल्या होत्या. लंडनच्या एका मंत्रीमंडळानं अग्निहोत्री यांना काश्मीर प्रश्नावर खास चर्चा करण्यासाठी निमंत्रित केल्याचंही अग्निहोत्री यांनी सांगितलं होतं.
आता अग्निहोत्री काश्मीर फाईल्सवरुन पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. त्यांनी आपण काश्मीर फाईल्सची पूर्ण स्टोरी सांगितल्याशिवाय शांत बसणार नाही. असं वक्तव्य केलं आहे. आपलं मिशन काश्मीर असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. अनुपम खेर, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या काश्मीर फाईल्सनं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. 20 कोटीमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं 200 कोटींहून अधिक कमाई केल्याचे दिसून आले होते. अनेक राज्यांनी देखील हा चित्रपट करमुक्त केला होता. महाराष्ट्रानंही देखील तो करमुक्त करावा अशी मागणी विधीमंडळात करण्यात आली होती. मात्र ती फेटाळण्यात आली. काश्मीर फाईल्सवर देशाचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.
हेही वाचा: Kashmir Files नवी Controversy; दिग्दर्शक शशी थरुर यांना 'माफी मागा' म्हणाले
13 मे रोजी काश्मीर फाईल्स हा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासुन तो ओटीटीवर येणार अशी चर्चा रंगली होती. 11 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली होती. त्याचा फायदा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झाला होता. सध्या काश्मीर फाईल्सचा म्युझिक इव्हेंट देखील प्रदर्शित करण्यात आला असून त्याचे नाव साउंड्स ऑफ काश्मीर फाईल्स असे आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अग्निहोत्री यांनी सांगितलं की, आम्ही जे सत्य आहे ते चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अद्यापही अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर यायच्या बाकी आहेत. ते आल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. असेही अग्निहोत्री यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा: Jammu-Kashmir | जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार
Web Title: The Kashmir Files Director Vivek Agnihotri Statement Not Stop Without Full Story
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..