Vivek Agnihotri(Director Of The Kashmir Files)
Vivek Agnihotri(Director Of The Kashmir Files)Google

The Kashmir Files: दिग्दर्शक जामा मशिदीसमोर नमाज पढताना दिसले अन्

'द काश्मिर फाईल्स' हा सिनेमा अनेक वादांमुळे चर्चेत असला तरी बॉक्सऑफिसवर मात्र जोरदार कमाई करत आहे.

विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सिनेमानं सत्य घटनेवर आधारित कथानक आणि कलाकारांच्या दमदार परफॉर्मन्समुळे बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील सिनेमा पाहून टीमचं कौतूक केलंय. काही राज्यात सिनेमाला टॅक्स फ्री करण्यात आलं आहे. भारतभरात तब्बल २००० हून अधिक स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. आज पाच दिवसांनी सिनेमानं तब्बल ६० कोटींचा बिझनेस केल्याचं बोललं जात आहे.

सिनेमाविषयी रोज नवनवीन काहीतरी ऐकायला मिळत आहे. कुणी सिनेमाच्या समर्थनार्थ भाष्य करीत आहे तर कुणी विरोधात जाऊन. पण याचा फायदा सिनेमाला होतोय हे बॉक्सऑफिस कलेक्शनवरनं स्पष्ट होत आहे. हा सिनेमा १९९० मध्ये खोऱ्यातील काश्मिरी पंडितांचा नरसंहार आणि पलायनावर आधारित आहे. त्यामुळे धार्मिक वादही सिनेमावरनं छेडले जातायत. त्यातच आता सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं एक जुनं ट्वीट आणि फोटो व्हायरल झालाय. हे ट्वीट १० वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे २०१२ सालातलं आहे. या फोटोत विवेक अग्निहोत्री जामा मशिदीसमोर नमाज पढताना दिसत आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की,'''जामा मशिदीत' #Freedom'' असं देखील त्यांनी लिहिलं आहे. हा जुना फोटो अचानक व्हायरल झाल्यामुळे आता वेगळीच चर्चा रंगू लागलीय.

Vivek Agnihotri(Director Of The Kashmir Files)
गीतकार संदीप खरे आणि अभिनेत्री मृणमयी देशपांडे रंगवणार नल-दमयंती

'द काश्मिर फाईल्स' हा सिनेमा ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. हा आठवडा संपता-संपता सिनेमा १०० कोटीच्या क्लबमध्ये विराजमान होऊ शकतो असे अंदाज ट्रेड अॅनलिस्ट लावत आहेत. या सिनेमात अनुपम खेर,मिथुन चक्रवर्ती,दर्शन कुमार,पल्लवी जोशी,चिन्मय मांडलेकर,मृणाल कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com