
पोलिसानेच व्हिडिओतून सांगितलं, माहिती नसलेलं 'काश्मीर फाईल्स'
The Kashmir Files Movies: काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे त्यांच्या चित्रपटामुळे भलतेच चर्चेत आले आहे. अकरा मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. (Entertainment News) मात्र सोशल मीडियावर जेव्हा वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी (Social Media news) त्यावरुन प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली तेव्हा मात्र काश्मीर फाईल्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. आता या चित्रपटाला राजकीय, आणि धार्मिक रंग आल्याचे म्हटले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर (PM Narendra Modi) देशाचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी देखील अग्निहोत्री यांच्या चित्रपटाचे कौतूक केले आहे. या चित्रपटावरुन जो राजकीय वाद निर्माण केला जात आहे तो चूकीचा असल्याची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.
आता विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या व्टिटवरुन काश्मीरमधल्या एका पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये त्यानं काश्मीरमध्ये खरी काय परिस्थिती आहे याविषयी सांगितलं आहे. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, दहशतवाद्यांनी तेथील मुस्लिम पोलीस अधिकारी आणि त्याच्या भावाला कशाप्रकारे मारले होते. त्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अग्निहोत्री यांचे व्टिटर हँडल हे चर्चेत आले आहे. ते सातत्यानं काश्मीर फाईल्सविषयी वेगवेगळ्या पोस्ट शेयर करत असल्याचे दिसून आले आहे. त्या पोलीस अधिकाऱ्यानं न पाहिलेलं काश्मीर फाईल्स अशा नावानं तो व्हिडिओ शेयर केला आहे. व्हिडिओसोबत त्या अधिकाऱ्याच्या पत्नीची वेदनाही मांडण्यात आली आहे. अग्निहोत्री यांनी आपल्या व्टिटरच्या अकाउंटवरुन तो व्हिडिओ शेयर केला असून त्याला नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे.
हेही वाचा: Kashmir Files ला दुबईत 'ग्रीन' सिग्नल; एकही दृष्य न वगळता 'स्क्रिनिंग'
अग्निहोत्री यांनी लिहिलं आहे की, मला आनंद आहे लोकं आता सकारात्मकतेनं काश्मीर फाईल्सकडे पाहत आहेत. जम्मु काश्मीरच्या लोकांनी आता जे कँपेन सुरु केले आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतोय. अनुपम खेर अभिनित काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाल्यानंतर 32 वर्षांपूर्वीचे अनेक प्रसंग यानिमित्तानं समोर आले आहेत. काश्मीर फाईल्सला देशभरातून मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 250 कोटीहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.
हेही वाचा: The kashmir files : परेश रावल यांनी केजरीवालांना सुनावले, जो मुलांची खोटी शपथ घेऊ शकतो..
Web Title: The Kashmir Files Police Share Killing Muslim Police Video Viral On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..