The Kerala Story च्या दिग्दर्शकाचा हैराण करणारा खुलासा,म्हणाले,'हा सिनेमा पाहून एका मुलानं केला माफीचा मेसेज..'

'द केरळ स्टोरी' सिनेमावरनं सुरू असलेल्या वादा दरम्यान दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना एका मुलानं मेसेज करुन त्यांची माफी मागितली आहे.
The Kerala Story Controversy
The Kerala Story ControversyInstagram

The Kerala Story: सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' सिनेमागृहात धुमाकूळ घालताना दिसत आहे. काही राज्यात या सिनेमावर बंदी आणल्यानंतरही हा सिनेमा अनेक ठिकाणी दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. बातमी आहे की सिनेमाला लवकरच जगभरात प्रदर्शित केलं जाणार आहे. यादरम्यान दिग्दर्शक सुदीप्तो सेननं एक खुलासा केला आहे की सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून एका मुलगा त्यांना लागोपाठ गलिच्छ भाषेत मेसेज करत राहिला पण नंतर...चला, याविषयी जाणून घेऊया सविस्तर.

द केरळ स्टोरीनं पहिल्या वीकेंडमध्ये ३३.३५ करोडची कमाई केली होती. तर रिपोर्ट अनुसार,सोमवारी सिनेमानं १०.५० करोडची कमाई केली. विरोध आणि बंदीचा सामना केल्यानंतरही 'द केरळ स्टोरी'ला अनेक ठिकाणी समर्थन मिळताना दिसत आहे. तर निर्मात्यांना आशा आहे की सिनेमा लवकरच ५० करोडचा आकडा पार करेल.

सोमवारी ८ मे रोजी एका कार्यक्रमा दरम्यान सुदीप्तो सेन यांनी सिनेमासंबंधित एक हैराण करणारा किस्सा शेअर केला आहे. The (kerala Story director sudipto sen said a boy first sent abusive message and after watching movie said sorry..)

The Kerala Story Controversy
The Kerala Story: 'एकट्यानं घराबाहेर पडू नकोस..'; 'द केरळ स्टोरी' सिनेमाच्या टीम मेंबरला धमकी..वाचा सविस्तर
The Kerala Story Controversy
Maharashtra Shair मधील 'बहरला हा मधुमास नवा' गाण्याची शिल्पा शेट्टीलाही पडली भुरळ..अभिनेत्री सना शिंदेची स्वारी खूश

हिंदुस्थान टाईम्समधील एका वृत्तानुसार,सुदीप्तो सेन यांनी म्हटलं आहे की,''जेव्हापासून द केरळ स्टोरीचा टीझर रिलीज झाला तेव्हापासून त्यांना आणि त्यांच्या टीमला एक मुलगा गलिच्छ भाषेतील मेसेज पाठवत होता. तो मुलगा गेल्या दोन महिन्यांपासून सिनेमाच्या सह-निर्मात्यांना अक्षरशः मेसेजमधनं शिव्या देत होता. पण जेव्हा त्यानं सिनेमा पाहिला तेव्हा त्यानं मेसेज करत चक्क माफी मागितली''.

सुदीप्तो सेन म्हणाले की,''आम्हाला असे मेसेज पाठवले जातात, जर तुम्हाला वाटतं की आम्ही सिनेमाच्या कथानकाला न्याय दिला नाही तर तुम्ही एकाच सिनेमासाठी आलेले दोन वेगवेगळे मेसेज पाहू शकता''.

दिग्दर्शकाचं म्हणणं आहे की,एक वेळ होती जेव्हा लोक आमच्या सिनेमाच्या विरोधात उभे होते आणि आज सिनेमा पाहिल्यानंतर त्याच लोकांनी विरोध करणं बंद केलं आहे. आजच्या तारखेला तेच लोक विरोध करत आहेत ज्यांनी सिनेमा पाहिलेला नाही.

The Kerala Story Controversy
Amruta Khanvilkar: जीव दंगला गुंगला रंगला असा..पिरमाची आस तू..
The Kerala Story Controversy
The Kerala Story ControversyGoogle

एएनआय च्या वृत्तानुसार,सुदीप्तो सेन यांनी आपल्या टीम मेंबरला धमकी मिळाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. ही धमकी एका अज्ञात नंबरहून आली होती. या मेसेजमध्ये 'घरातून एकट्यानं बाहेर पडू नको..ही स्टोरी दाखवून तुम्ही चांगलं केलं नाही' असं म्हटलं गेलं आहे.

'द केरळ स्टोरी'चा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा यात दावा केला गेला होता की केरळमधून ३२ हजार मुली गायब झाल्या.आणि नंतर त्यांना धर्म बदलून आयएसआय मध्ये सामिल केलं गेलं. यानंतरच सिनेमाविषयी मोठा वाद उसळला..आणि बोललं गेलं की हा एक प्रोपगेंडा सिनेमा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com