The Kerala Story सिनेमा विरोधात मॉरिशसमध्ये मोठा कट.. थिएटर मालकाला मिळालेल्या धमकीत म्हटलंय..The Kerala Story Controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The Kerala Story Controversy

The Kerala Story सिनेमा विरोधात मॉरिशसमध्ये मोठा कट.. थिएटर मालकाला मिळालेल्या धमकीत म्हटलंय..

The Kerala Story Controversy: अदा शर्मा अभिनित 'द केरळ स्टोरी' आपल्या ट्रेलर लॉंच पासूनच वादात सापडला आहे. सिनेमावर आलेल्या बंदीपासून ते बॉक्सऑफिसवर सिनेमाला मिळालेल्या यशापर्यंत..कितीतरी दिवसांपासून हा सिनेमा काही ना काही कारणामुळे बातम्यांच्या हेडलाईनमध्ये आहे.

सुदीप्तो सेनच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या या सिनेमाच्या कथेची खूप चर्चा रंगली. पण सिनेमाला मात्र खूप प्रेम मिळताना दिसत आहे. भारतात रिलीज झाल्यानंतर हा सिनेमा ४० हून अधिक देशांमध्ये रिलीज झाला आणि तिथे देखील याची वाहवाच झाली. पण काही लोकांनी द केरळ स्टोरीला एक प्रोपोगेंडा सिनेमा देखील म्हटलं. (The Kerala Story Screening in mauritius threatened by isis supporters claims)

नुकतीच द केरळ स्टोरी सिनेमाला घेऊन मोठी बातमी समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनी दावा केला आहे की 'द केरळ स्टोरी' मॉरिशसमध्ये दाखवला जाणार आहे म्हणून एका थिएटरला बॉम्बनं उडवायची धमकी मिळाली आहे.

काही मीडिया रिपोर्ट्सनी दावा केला आहे की मॉरिशसमधील एका थिएटर फ्रॅंचायजीनं 'द केरळ स्टोरी'चे निर्माता विपुल शाह यांना एक मेल पाठवला आहे ज्यात त्यांनी लिहिलं आहे की, 'दहशतवादी संघटना आयएसआयएसकडून थिएटरला बॉम्बनं उडवायची धमकी मिळाली आहे'.

रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं आहे की, मॉरिशसच्या थिएटर मालकांनी त्यांना आलेली धमकीची चिट्ठी निर्माते विपुल शाह यांना पाठवली आहे,ज्यात लिहिलं आहे,''सर/मॅडम,द मॅकिन(सिनेमागृहाचं नाव) उद्या उद्ध्वस्त होईल,कारण आम्ही तुमच्या थिएटरला बॉम्बनं उडवणार आहोत. तुम्हाला सिनेमा पहायचा आहे,ओके..उद्या तुम्हाला चांगलाच सिनेमा पहायला मिळेल. आमच्या शब्दांना लक्षात ठेवा,उद्या आम्ही मॅकिन थिएटरमध्ये 'द केरळ स्टोरी'चा शो बंद पाडण्यासाठी बॉम्ब ठेवणार आहोत''.

असं देखील बोललं जात आहे की ही धमकी मिळाल्यानंतर थिएटरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत निर्माता विपुल शाह,दिग्दर्शक सुदीप्तो सेन किंवा सिनेमाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीकडून या संदर्भात अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही.

सुदीप्तो सेनच्या 'द केरळ स्टोरी'नं जगभरातील बॉक्सऑफिसवर दणकून कमाई केली. या सिनेमानं वर्ल्डवाईड २७३ करोड कमावले तर त्याव्यतिरिक्त सिनेमानं भारतात २२४.६६ इतकी नेट कमाई केली आहे.