The Vaccine War Movie : सुधा मुर्तींनी केलं विवेक अग्निहोत्रींच्या 'व्हॅक्सिन वॉर'चं कौतुक, म्हणाल्या 'आता आपला देश....'

प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द व्हॅक्सिन वॉर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
Sudha Murthy reviews Vivek Agnihotri's The Vaccine War
Sudha Murthy reviews Vivek Agnihotri's The Vaccine Waresakal

Sudha Murthy reviews Vivek Agnihotri's The Vaccine War : द काश्मिर फाईल्समुळे चर्चेत आलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द व्हॅक्सिन वॉर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यामध्ये जेष्ठ कलाकार नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरीजा ओक यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सध्या अग्निहोत्री यांच्या व्हॅक्सिन वॉरचे जोरदार प्रमोशन सुरु झाले आहे. त्यात नाना पाटेकर यांचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी नानांनी वेगवेगळ्या मुलाखतीतून द व्हॅक्सिन वॉर आणि त्यामध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेविषयी सांगितले आहे. याशिवाय त्यांनी सध्याचे बॉलीवूड, त्यातील सेलिब्रेटी आणि त्यांची भूमिका यावरही आपल्या शैलीतून भाष्य केले आहे.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर

अग्निहोत्री यांच्या द काश्मिर फाईल्स नावाच्या चित्रपटानं वेगळ्याच विषयाला तोंड फोडले होते. त्यातून हिंदू पंडितांची काश्मिरच्या खोऱ्यात झालेली कत्तर आणि त्यांचे विस्थापन याविषयावर काश्मीर फाईल्समधून प्रभावीपणे मांडण्यात आले होते. त्या चित्रपटावरुन मोठा वादही झाला होता. त्या चित्रपटाला धार्मिक अन् राजकीय रंगही आला होता.

Sudha Murthy reviews Vivek Agnihotri's The Vaccine War
Jawan BO : गणपती बाप्पा शाहरुखला पावला! गणेश चतुर्थीच्या दिवशी पार केला इतक्या कोटींचा टप्पा

आता प्रसिद्ध लेखिका आणि विचारवंत सुधा मुर्ती यांनी अग्निहोत्री यांच्या द व्हॅक्सिन वॉर पाहिल्यानंतर त्याचे कौतुक केले आहे.त्याविषयी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्टही व्हायरल झाल्या आहेत. सुधा मुर्ती यांनी म्हटले आहे की, प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे पुरुषाचेही योगदान असते हे आपल्याला विसरता येणार नाही.

अग्निहोत्री यांच्या या चित्रपटातून आपल्यासमोर अनेक गोष्टी येतात. व्हॅक्सिन वॉरमधून दिग्दर्शकानं टीमवर्क आणि त्यातून मिळणारे यश हे सारं आपल्याला खूप काही शिकवून जाणारे आहे. कोरोनाच्या काळात सगळ्यांनी मिळून जे टीमवर्क केले ते दिग्दर्शकानं प्रभावीपणे आपल्यासमोर आणले आहे.

अग्निहोत्री यांचा हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पल्लवी जोशी यांची निर्मिती असलेला हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com