Vivek Agnihotri : 'राग आला तर नाना पाटेकर दिग्दर्शकालाही....'! विवेक अग्निहोत्रींच्या मनातही होती भीती

द काश्मीर फाईल्सपासून आपल्या नावाची वेगळी छाप उमटविण्यात विवेक अग्निहोत्री हे यशस्वी झाले आहेत.
The Vaccine War Vivek Agnihotri Nana Patekar Role
The Vaccine War Vivek Agnihotri Nana Patekar Role esakal

The Vaccine War Vivek Agnihotri Nana Patekar Role : द काश्मीर फाईल्सपासून आपल्या नावाची वेगळी छाप उमटविण्यात विवेक अग्निहोत्री हे यशस्वी झाले आहेत. आतापर्यत बॉलीवूडमध्ये ज्या चित्रपटांवरुन सर्वाधिक वाद झाला आहे त्यात काश्मिर फाईल्सचे नाव पहिल्या तीनमध्ये येते असे आता म्हटले जाते. अग्निहोत्री यांचा द व्हॅक्सिन वॉर २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतो आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

काश्मिर फाईल्सचा भलेही मोठा वाद झाला असेल पण त्याला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसादही प्रचंड होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं मोठी कमाई केली होती. दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला होता. यासगळ्यात अग्निहोत्री यांच्या व्हॅक्सिन वॉरवरुन पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

Also Read - नांव Fire - पण पुढचं आयुष्य 'थंडा थंडा, कूल कूल'

अग्निहोत्री यांच्या व्हॅक्सिन वॉरमध्ये नाना पाटेकरांनी महत्वाची भूमिका दिली आहे. त्यांनी शास्त्रज्ञ डॉ. भार्गव यांची भूमिका साकारली असून यापूर्वी नाना यांच्या व्हायरल मुलाखतींनी वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती. नानांनी त्यांच्या परखड स्वभावात दिलेल्या मुलाखतींनी खळबळ उडवून दिली होती. त्यात नानांनी सध्याच्या बॉलीवूडच्या परिस्थितीवर परखडपणे भाष्य केले होते.

The Vaccine War Vivek Agnihotri Nana Patekar Role
Jawan Shah Rukh Khan: शाहरुखचा जवान कसा वाटला? सत्यजित तांबे म्हणतात...

शाहरुख खान, सनी देओल यांच्या चित्रपटाविषयी तसेच बॉलीवूडमध्ये होणारे बदल, बदलेले चित्रपट, त्यांचे आशय याबाबत नानांनी त्यांच्या शैलील समाचार घेतला होता. द व्हॅक्सिन वॉरच्या निमित्तानं जे प्रमोशन शो आणि मुलाखती झाल्या त्यात अग्निहोत्री यांनी नाना या नावाचा किती दरारा आहे हे सांगितले होते. आपल्या अनेकांनी तू नानासोबत काम करतो आहेस तेव्हा जरा जपून असा सल्ला दिला होता.

नानांना प्रत्येक गोष्टीत अचूकता हवी असते. आपण कलाकार म्हणून पूर्णपणे त्या भूमिकेला न्याय द्यायला हवा. असे त्यांचे म्हणणे असते. तेच दिग्दर्शकाच्याबाबती त्यांना वाटते. त्यामुळे दिग्दर्शकासोबत जर त्यांचा विसंवाद झाल्यास ते त्यांच्याशी भांडणं झाली आहेत. असे मला सांगण्यात आले होते. अशी आठवण अग्निहोत्री यांनी यावेळी त्या मुलाखतीतून शेयर केली होती.

The Vaccine War Vivek Agnihotri Nana Patekar Role
Nana Patekar : 'आजकालचे अभिनेते हे...' नाना पाटेकर पुन्हा बोलले! जुन्या काळातील दिग्गजांच्या आठवणींना दिला उजाळा

अग्निहोत्री यांचा द व्हॅक्सिन वॉर हा भारतातील पहिला बायो सायन्स विषयावरील चित्रपट आहे. एबीपीला अग्निहोत्री यांनी दिलेल्या त्या मुलाखतीमध्ये सांगितले की, नानांना एखाद्या भूमिकेसाठी तयार करणे ही मुळातच खूप अवघड गोष्ट आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते मेन स्ट्रीम मुव्ही लाईनमध्ये नाहीत. मला अनेकांनी सांगितले होते की, नानांसोबत काम करु नका. ते मारायलाही कमी करत नाहीत. असे त्या लोकांचे म्हणणे होते.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com